Awarapan 3 Confirmed Emraan Hashmi: 2007 साली रिलीज झालेला 'आवारापन' (Awarapan) या कल्ट क्लासिक सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. प्रदर्शनाच्या 19 वर्षांनी 'आवारापन 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. काल म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी 'आवारापन 2' (Awarapan 2) हा सिनेमा रिलीज झाला होता.  या सिनेमातील शिवम पंडीत ही भूमिका प्रचंड गाजली.  इम्रान हाश्मीचा (Emraan Hashmi) तीव्र आणि गंभीर लूक प्रेक्षकांना आवडला होता.  'आवारापन 2' या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आता या सिनेमाचा तिसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीस येणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. सोशल मीडियावर सध्या या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टबाबत चर्चा होत आहे.

Continues below advertisement

'आवारापन 3' प्रेक्षकांच्या भेटीस येणार का? नक्की खरं काय? (Awarapan 3 Confirmed Emraan Hashmi Drops a Big Hint)

'आवारापन' या सिनेमाचा तिसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार की नाही, याचं उत्तर 'आवारापन 2' या सिनेमाच्या शेवटी दडलेलं आहे.  'आवारापन 2' हा सिनेमा काल म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज झाला.  या सिनेमाचा लीड कलाकार  इम्रान हाश्मी  आणि दिशा पटानी हे मुंबई स्थित एका थिएटरमध्ये प्रेक्षकांना सरप्राइज द्यायला पोहोचले. यावेळी त्यांनी प्रेक्षकांची भेट घेतली. तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी इम्रान हाश्मीने सर्वांसमोर एक मोठी घोषणा केली.  जे ऐकून उपस्थित प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला.

इम्रान हाश्मी प्रेक्षकांसोबत संवाद साधताना म्हणाला, 'हा सिनेमा प्रेक्षकांमुळे साकार झाला आहे. हा सिनेमा तुम्हाला आवडला असेल. तुमच्यामुळे हे शक्य झालं आहे. आशा आहे की, 'आवारापन 3' देखील लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीस येईल', असं अभिनेता म्हणाल. हे ऐकताच सिनेमागृहात प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. प्रेक्षकांना प्रचंड आनंद झाला.  आता प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान,  'आवारापन' या सिनेमाचा सिक्वेल तब्बल 19 वर्षांनी रिलीज झाला. आता तिसरा पार्ट कधी प्रेक्षकांच्या भेटीस येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

ओपनिंग डेला इम्रान हाश्मीच्या 'आवारापन 2' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली.  'आवारापन 2' या सिनेमाचा प्रेक्षकांमध्ये क्रेझ निर्माण झाला होता.  या सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी  हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता दर्शवली.  'आवारापन 2' या सिनेमाने पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात केली.   ओपनिंग डेला 21 कोटींचं कलेक्शन केलं.  'बटवारा 1947'च्या तुलनेत 'आवारापन 2' या सिनेमाने 200 टक्के पेक्षा जास्त कमाई केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...