Toxic Movie Teaser Release : कन्नड सुपरस्टार अभिनेता यशने वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी मोठी भेट दिली आहे. अभिनेता यशच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. कन्नड स्टार यशचा 8 जानेवारी रोजी वाढदिवस असल्यामुळे या निमित्ताने त्याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला असून चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'टॉक्सिक'च्या फर्स्ट लूकमध्ये यशचा गँगस्टर लूक पाहायला मिळत आहे. सूट-बूट, डोक्यावर टोपी, गळ्यात चैन आणि तोंडात सिगार असा यशचा डॅशिंग लूक समोर आला आहे. 'टॉक्सिक' चित्रपटातील यशचा फर्स्ट लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
'टॉक्सिक' चित्रपटाचा धमाकेदार टीझर
कन्नड स्टार यशच्या केजीएफ फ्रेंचायझीने जगभरात सिनेमा जगतात मोठा बेंचमार्क सेट केला. केजीएफ आणि केजीएफ 2 चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. यानंतर आता रॉकिंग स्टार यश पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. यशच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'टॉक्सिक' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
'टॉक्सिक' यशचा चित्रपटाचा फर्स्ट लूक
अभिनेता यश आता गीतू मोहनदासच्या आगामी ॲक्शन थ्रिलर चित्रपटासह पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. यशच्या 'टॉक्सिक : अ फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स' या चित्रपटासह बॉक्स ऑफिसवर धडकण्यास तयार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी यशच्या वाढदिवसानिमित्त टॉक्सिक चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी केला आहे. टॉक्सिक चित्रपटाचा छोटासा टीझर रिलीज करण्यात आला आहे.
अंडरवर्ल्ड गँगस्टरच्या भूमिकेत यशचा स्वॅग
'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स' चित्रपटाचा एका मिनिटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टॉक्सिक चित्रपटाच्या टीझरमध्ये यशला रफ आणि टफ गँगस्टर लूकमध्ये दिसत आहे. पांढरा सूट घातलेला यशचा क्लासी गँगस्टर लूक आणि स्वॅग लयभारी दिसत आहे. अभिनेता यश स्वॅगमध्ये एका बारमध्ये जाताना दिसत आहे. त्याचे लांबलचक केश आणि दाढीने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. त्याचा लूक पाहून चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. यावरुन यश अंडरवर्ल्ड गँगस्टरची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. टीझरमध्ये यश पबमध्ये पार्टी करताना दिसत आहे.
'टॉक्सिक' यशचा चित्रपटाचा टीझर पाहा
महत्त्वाच्या इतर बातम्या :