मुंबई : बॉलिवुडसाठी 2024 हे साल फारचे चांगले राहिले नाही. मोठा गल्ला जमवणारा तसेच जागतिक पातळीवर नावाजला गेलाला कोणताही सिनेमा बॉलिवुडमध्ये आला नाही. अर्थात याला लापता लेडीज या चित्रपटासारखे काही अपवाद आहेत. पण 2024 या साली बॉलिवुडच्या तुलनेत दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीने मात्र चांगलाच डंका वाजावला. दाक्षिणात्त्य सिनेमांनी गेल्या वर्षी फक्त भारतच नव्हे तर जगभरात नाव कमवले. या चित्रपटांनी परदेशातही अनेक अवॉर्ड्स मिळवले. दरम्यान, 2025 सालावरही राज्य करण्यासाठी दाक्षिणात्त्य सिनेसृष्टी सज्ज झाली आहे. कारण या वर्षी अनेक मोठे आणि दमदार दाक्षिणात्त्य सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. 


या वर्षी पाच मोठे दाक्षिणात्त्य चित्रपट रिलीज होणार आहेत. या सर्वच चित्रपटांची देशभरात मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हे पाच चित्रपट खालीलप्रमाणे आहेत. 


कांतारा चॅप्टर-1


यातील पहिला चित्रपट हा कांतारा चॅप्टर-1 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कांतारा हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता दिग्दर्शक ऋषभ शेट्टी कातांरा-2 म्हणजेच कांतारा चॅप्टर-1 या चित्रपटावर काम करतोय. हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 


2. गेम चेंजर


RRR यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम करणाऱ्या तसेच मोठी फॅन फॉलोविंग असणाऱ्या राम चरणचा गेम चेंजर हा चित्रपट याच वर्षी येणार आहे.  गेम चेंजर या चित्रपटात राम चरण हा राजकीय सल्लागाराची भूमिका बजावतो आहे.या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील दिसणार आहे. 10 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  


3. राजा साहब


'बाहुबली' या चित्रपटानंतर प्रभासचा एकही बॉकबस्टर चित्रपट आलेला नव्हता. मात्र 2024 साली प्रदर्शित झालेल्या 'कल्की 2898 AD' या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. त्यानंतर आता 2025 साली प्रभासचा 'राजा साहब' हा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट हॉरर, कॉमेडी आहे. या चित्रपटात प्रभास भूत-प्रेतांसोबत लढताना दिसणार आहे. 10 एप्रिल 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


4. ठग लाइफ


या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम करणार आहेत. या चित्रपटात कमल हसन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हो दोन्ही दिग्गज तब्बल 36 वर्षांनी एकत्र काम करत आहेत. हा एक गँगस्टर ड्रामा आहे. कमल  हसन यांचा 2024 साली 'इंडियन 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्यांचा 2025 साली 'ठग लाइफ' हा चित्रपट येतोय. हा चित्रपट 5 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. 


5. कुली


गेल्या बऱ्याच दिवसांपासून रजनिकांत यांचा चित्रपट आलेला नाही. मात्र 2025 साली त्यांचा कुली हा चित्रपट येणार आहे. 2024 साली त्यांचा वेट्टियां हा चित्रपट आला होता. मात्र तो फारशी कमाल करू शकला नाही. त्यानंतर आता कुली या चित्रपटात ते प्रमुख भूमिकेत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेस कनगराज हे करणार आहेत. या चित्रपटात नागार्जुन, सत्याराज, श्रुती हसन आदी कलाकार दिसणार आहेत. 1 मे 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


हेही वाचा :


सलमान शॉर्ट ड्रेस घालण्यास मनाई करायचा, नेहमी कंट्रोलमध्ये ठेवायचा, एक्स गर्लफ्रेंडने केले खळबळजनक खुलासे!


आर्यन खानचं गर्लफ्रेंडसोबत जोमात न्यू ईअर सेलिब्रेशन, शॉर्ट ड्रेसमध्ये झळकलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?