आर्यन खानचं गर्लफ्रेंडसोबत जोमात न्यू ईअर सेलिब्रेशन, शॉर्ट ड्रेसमध्ये झळकलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण?
Aryan Khan with Rumoured Girlfriend: आर्यन खान ने नए साल का जश्न अपने अंदाज में मनाया. वो रूमर्ड गर्लफ्रेंड के साथ पार्टी करते नजर आए.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2025 हे साल आलं आहे. बॉलिवुडमध्ये या नव्या वर्षाचे स्वागत सर्वांनीच आपापल्या पद्धतीने केले. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननेदेखील मोठ्या थाटात नव्या वर्षाचे स्वागत केले.
आर्यन खान नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एका पार्टीत सामील झाला होता. त्याच्यासोबत त्याची कथित गर्लफ्रेंड लारिसा बोनेसी हीदेखील झळकली. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
हे दोघेही एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले आहेत. या फोटोंमध्ये आर्यन खान कॅज्यूअल लुकमध्ये दिसतोय. आर्यन खानने व्हाईट टी-शर्ट, ब्लू जॅकेट तसेच ब्लॅक पॅन्ट परिधान केलेली आहे. त्याच्या पायाता सिल्व्हर स्नीकरदेखील दिसत आहे.
तर दुसरीकडे लारिसा बोनेसी ही ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिचेही फोटो शोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने शिमरी शॉर्ट पिंक ड्रेस परिधान केला आहे. यासह तिने एक व्हाइट जॅकेट आणि सिल्वहर हील्स घातलेल्या आहेत. तिच्या गळ्यात एक सुंदर नेकपीसदेखील दिसत आहे. मोकळ्या केसांत ती चांगलीच गोड दिसत आहे.
आर्यन आणि लारिसा हे दोघेही पार्टीच्या ठिकाणी दिसले. त्यांच्यासोबत त्यांचे मित्रदेखील होते. या दोघांनाही पापाराझींना फोटो देणे टाळले.
लारिसा एक मॉडल-अॅक्ट्रेस आहे. तिने आतापर्यंत तमिळ तसेच काही हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे.
तर आर्यन खानने दिग्दर्शित केलेली एक वेब मालिका लवकरच प्रदर्शित होणार आहे. ही वेबमालिका नेटफ्लिक्सवर रिलिज होणार आहे.