Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding :  सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये लगीनसराई सुरु आहे. नुकताच अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर (Kshitija Ghosalkar) हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. तर आता अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) आणि तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) यांची लगीनसराई सुरु आहे. नुकतच त्यांनी त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. तसेच त्यांच्या हळदीचा सोहळा देखील संपन्न झाला. या सोहळ्यातला सिद्धार्थ डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 


सिदार्थ आणि तितिक्षा हे आज लग्नबंधनात अडकणार आहेत. त्याआधी त्यांच्या लग्नाच्या विधींचे फोटो त्यांच्या मित्रमंडळींकडून शेअर करण्यात येत होते. हळदीच्या समारंभात सिद्धार्थने त्याच्या वडिलांसोबत केलेला डान्स सध्या चर्चेत आलाय. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत या जोडप्याने त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. या दोघांनीही त्यांच्या केळवणाचा फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली होती. तसेच आता त्यांच्या हळदीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 






 


तितिक्षा आणि सिद्धार्थचा साखरपुडा 


तु अशी जवळी रहा या मालिकेतली ही जोडी अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या ऑन स्क्रिन जोडीने ऑफ स्क्रिन देखील आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अफेरच्या चर्चा सुरु असतानाच तितिक्षाने त्यांच्या केळवणाचा फोटो शेअर केला. तसेच सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. 


सिद्धार्थ आणि तितीक्षाने सोशल मीडियावर तीन पोस्ट शेअर करत चाहत्यांना साखरपुडा झाल्याची बातमी दिली आहे. पहिला फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"Forever with my best friend". सिद्धार्थ-तितीक्षाच्या फोटोवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सारखपुड्यात तितीक्षाने फिकट जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. तर सिद्धार्थने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती.


अशी घातली सिद्धार्थने तितिक्षाला लग्नाची मागणी 


सिद्धार्थने तितिक्षाला ज्या प्रकारे लग्नाची मागणी घातली त्यांचा तो व्हिडिओ देखील बराच चर्चेत आहे. चाहुल कुणाची हे तितिक्षा आणि सिद्धार्थचं नवं गाणं नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्या गाण्यादरम्यान सरप्राईज देत तितिक्षाला लग्नाची मागणी घातली. त्याचा हा गोड व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या बराच पसंतीस उतरत आहे. तसेच आता त्यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. 






ही बातमी वाचा : 


Titeeksha Tawde Siddharth Bodke Engagement : तितीक्षा तावडे अन् सिद्धार्थ बोडकेने गुपचूप उरकला साखरपुडा; पहिला फोटो समोर, उद्या अडकणार लग्नबंधनात