Titeeksha Tawde and Siddharth Bodke Wedding :  अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) आणि सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) हे आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे. त्याआधी तितिक्षाने तिच्या युट्युब चॅनवरुन सिद्धार्थने तिला केलेल्या प्रपोजचा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहुल कुणाची हे नवं गाणं तितिक्षाने शेअर केलंय. त्या गाण्यामध्येच सिद्धार्थने तितिक्षाला प्रपोज केलं आहे. 


काही दिवसांपूर्वी तितिक्षाने त्यांच्या प्रपोजलचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये सिद्धार्थने तिला कशा प्रकारे सरप्राईज देत प्रपोज प्लॅनिंग कसं केलं हे त्यांनी सांगितलं होतं. पण सिद्धार्थने तितिक्षाला कसं प्रपोज केलं आणि त्यानंतर तितिक्षाची नेमकी काय रिअॅक्शन होती, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली होती. पण आता तितिक्षाने हा देखील व्हिडिओ शेअर केला आहे. यावर त्यांच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद देत त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.


तितिक्षाला सिद्धार्थने असं केलं प्रपोज


तितिक्षा तिच्या नव्या गाण्याच्या शुटींगसाठी गेली होती. तेव्हा तिथे सिद्धार्थही गेला होता. गाण्याच्या शुटींगमध्ये शेवटच्या सीनला सिद्धार्थ तितिक्षासमोर जातो. त्यावेळी त्याला पाहून तितिक्षाला एक सुखद धक्का बसतो. त्यावेळी सिद्धार्थ तितिक्षाला प्रपोज करत लग्नाची मागणी घालतो. त्यांच्या या गोड प्रपोजलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. 






तितिक्षा आणि सिद्धार्थची लगीनघाई


तितिक्षा आणि सिद्धार्थ हे 26 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन त्यांची सध्या लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच तितिक्षाच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेहंदी देखील रंगली आहे. त्यामुळे आता लवकरच आणखी एक जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. तितिक्षा आणि सिद्धार्थने त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. 



तितिक्षा आणि सिद्धार्थ यांची लव्हस्टोरी 


तितिक्षा आणि सिद्धार्थ हे झी युवा वाहिनीवरील तु अशी जवळी रहा या मालिकेत काम करत होते. त्यावेळी सेटवर त्यांची मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. त्यानंतर तितिक्षा आणि सिद्धार्थ यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यांच्या सोशल मीडियावरही त्यांनी त्यांचे अनेक फोटो शेअर केले आहेत.


ही बातमी वाचा : 


Prathamesh Parab Wedding : नांदा सौख्यभरे! प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकरचा लग्नसोहळा संपन्न, फोटो शेअर करत दिलं हटके कॅप्शन