Prathamesh Parab Wedding :  अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत (Kshitija Ghosalkar) लग्नबंधनात अडकला आहे. मागील काही दिवसांपासून प्रथमेश आणि क्षितीजाच्या लग्नाचे विधी सुरु होते. 14 फेब्रुवारी रोजी या जोडप्याने साखरपुडा करत त्यांच्या एकत्रित प्रवासाला सुरुवात केली. सध्या प्रथमेशने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकले असून चाहत्यांनी त्याला त्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. प्रथमेशच्या प्रीवेंडींग पोस्टवर देखील चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. 


अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने संसार थाटण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना हा सुखद धक्का दिला.प्रथमेशने व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी साखरपुडा केला होता. कारण त्याच्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे खूप खास  आहे. सध्या त्याच्या लग्नाच्या फोटोंवर अनेक कलाकार मंडळींनी देखील कमेंट्स करत त्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 






लग्नाचे फोटो शेअर करत दिलं कॅप्शन 


प्रथमेश आणि क्षितीजाच्या लग्नाची गोष्ट ही लॉकडाऊनपासून सुरु झाली होती. त्यामुळे प्रथमेशने त्याच्या लग्नांच्या फोटोंना हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने म्हटलं की, Finally...... Lockdown love story चे Hearts, forever साठी locked. त्याच्या या कॅप्शनवर चाहते देखील खूष झाले आहेत. 


प्रथमेशसाठी म्हणून आहे 'व्हॅलेंटाईन्स डे' खास






अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खूपच खास आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्टदेखील शेअर केली होती. त्याने लिहिलं होतं,'व्हॅलेंटाईन डेचं आमच्या रिलेशनमध्ये विशेष स्थान आहे. म्हणजे आमचा या कंसेप्टवर विश्वास नाही. पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टी खूप खास बनतात. 14 फेब्रुवारी 2020 रोजी मी क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सीरिज पाहिली आणि तिला मेसेज केला होता. 14 फेब्रुवारी 2021 रोजी आम्ही रिलेशनमध्ये आलो. 14 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या रिलेशनला एक वर्ष पूर्ण झालं. 14 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही आमचं रिलेशन जगजाहीर केलं. त्यामुळे प्रथमेशने 14 फेब्रुवारी 2024 रोजी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला होता. 






ही बातमी वाचा : 


Prathamesh Parab Wedding :  'तुझी आठवण कायम राहिल..', लग्नाच्या काही तास आधी दगडूच्या पराजूची घरासाठी भावनिक पोस्ट,तर पोस्टवरील प्रथमेशच्या कमेंटची चर्चा