Aai Kuthe Kay Karte Serial Update : 'स्टार प्रवाह' वाहिनीवर सुरु होणाऱ्या नव्या मालिकांमुळे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) हा मालिका संपणार का अशा चर्चा सुरु होत्या. पण ही मालिका दुपारच्या सत्रात सुरु होणार असल्याची माहिती समोर आली. सध्या या मालिकेमध्ये अरुंधतीच्या दुसऱ्या संसारतही बऱ्याच अडचणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मनूमुळे अरुंधती आणि आशुतोषमध्ये सध्या तणाव आहे. त्यातच देशमुखांच्या घरी वारंवार जाण्यावरही आशुतोष आता आक्षेप घ्यायला लागला आहे. आजच्या महाएपिसोडमध्ये देशमुखांकडे जाण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या संसारात कोणतं नवं वादळ येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 


मालिकेमध्ये माया म्हणजेच मनूच्या आईची एन्ट्री झाल्यानंतर पुन्हा एकदा अरुंधतीच्या संसरात नवं वादळ आलं. माया आशुतोषच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच मनूने आई म्हणून अरुंधतीचा स्विकार केल्यानंतरही अरुंधती मात्र मनूचा अजूनही स्विकार करत नसल्याचं समज आशुतोषने करुन घेतला आहे. त्यामुळे आशुतोषचा सध्या बऱ्याच गोष्टीवरुन गैरसमज होत असल्याचं पाहायला मिळतंय. 


अरुंधती संसार पुन्हा लागणार पणाला?


देशमुखांच्या मदतीसाठी जाताना अरुंधतीचं आशुतोष आणि मनूकडे दुर्लक्ष होत असल्याचं आशुतोषचं म्हणणं आहे. आशुतोष आणि अरुंधती बाहेर जाणार असतात. त्यासाठी अरुंधती तिची बॅग भरत असते. त्यावेळी आशुतोष तिला म्हणतो की, देशमुखांच्या घरुन एक फोन आला तेव्हा तु सगळं सोडून तिथे जाशील. त्यानंतर यश अरुंधतीला फोन करतो आणि अनघाला अॅडमिट  केल्याचं सांगतो. त्यावेळी अरुंधती हॉस्पिटला जाते. त्यामुळे देशमुखांच्या मदतीसाठी जाताना अरुंधतीच्या संसाराची गाठ सुटणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 






अनघाला चक्कर आल्याने तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागतं. त्यामुळे यश घाबरुन अरुंधतीला फोन करतो. त्याचा फोन आल्यानंतर अरुंधती अर्ध्या रात्री हॉस्पिटलमध्ये जाते. पण सकाळी आशुतोषला जेव्हा हे सगळं कळेल तेव्हा आशुतोष काय करणार, पुन्हा गैरसमज होणार की आशुतोष अरुंधतीला समजून घेणार हे आजच्या महाएपिसोडमध्ये कळणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Premachi Goshta : इंद्रा काढणार मुक्ताला घराबाहेर, सागर देणार बायकोची खंबीर साथ, स्वातीचं सत्य घरच्यांसमोर येणार?