Thipkyanchi Rangoli : स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ठिपक्यांची रांगोळी (Thipkyanchi Rangoli) ही मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. एकत्र कुटुंब पद्धती दाखविण्यात आलेल्या या मालिकेने आता वेगळंच वळण घेतलं आहे. कानिटकरांची आन, बान आणि शान असलेला वाडा विकण्याचा निर्णय विनायक दादांनी घेतला आहे. अशातच मालिकेत दुर्गा आत्याची एन्ट्री होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे (Shubha Khote) दुर्गा आत्याची भूमिका साकरणार असून बऱ्याच वर्षांनंतर त्या मराठी मालिकेत दिसणार आहेत.
मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शुभा ताई म्हणाल्या...
या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शुभा ताई म्हणाल्या, ‘ठिपक्यांची रांगोळी ही माझी सर्वात आवडती मालिका आहे मी दररोज आवर्जून पहाते. या मालिकेतील प्रत्येक पात्र माझ्या आवडीचं आहे. मला जेव्हा या व्यक्तिरेखेसाठी विचारणा झाली तेव्हा क्षणाचाही विचार न करता मी होकार दिला. या मालिकेत मी दुर्गा आत्याची भूमिका साकारणार आहे. वरवर पहाता कठोर वाटणारी दुर्गा आत्या मनाने खूपच हळवी आहे."
एकत्र कुटुंब व्यवस्थेवर आधारित मालिका
एकत्र कुटुंब व्यवस्थेवर दाखविण्यात आलेल्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने सध्या वेगळेच वळण घेतले आहे. आतपर्यंत एकत्र एका छताखाली राहत असणारं कानिटकर कुटुंबात नाराजीचा सूर उमटताना दिसतोय. याचं कारण म्हणजे कानिटकर कुटुंबाची शान असलेला वाडा हा विनायक दादांनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्य नाराज दिसून येत आहेत.
मालिकेत कोणता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार
आता मालिकेत नव्याने एन्ट्री होणाऱ्या दुर्गा आत्यामुळे घरात नेमकं कोणतं वातावरण निर्माण होईल? तसेच तिच्या येण्याने कथानकात नेमका कोणता ट्विस्ट येणार? कानिटकर वाड्यावरचं संकट टळणार का? हे पाहाणं उत्सुकतेचं असणार आहे. पण त्याचबरोबर, विनायक दादांनी वाडा विकण्याचा निर्णय नेमका का घेतला? हे पाहणंही प्रेक्षकांसाठी तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. सिर्फ तुम, परदेस, जमीर, दिल है कि मानता नहीं यांसारख्या अनेक चित्रपटांतून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
महत्वाच्या बातम्या :