Varhad Nighalay Londonla: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak) हा वऱ्हाड निघालं लंडनला (Varhad Nighalay Londonla) या नाटकामध्ये एक शाल आणि 52 भूमिका घेऊन रंगमंचावर एन्ट्री करतो. संदीपची एन्ट्री झाल्यानंतर काही क्षणातच तो आपल्या संवादानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतो. त्याची क्षणात भूमिका बदलण्याची शैली, विनोदी अंदाज पाहून प्रेक्षक भारावून जातात. या नाटकाचा 450 वा प्रयोग आज (4 डिसेंबर) 450 वा प्रयोग हा औरंगाबाद येथे होणार आहे.


 वऱ्हाड निघालं लंडनला हे नाटक लक्ष्मणराव देशपांडे यांनी रंगभूमीवर आणलं. लक्ष्मणराव देशपांडे यांनी या नाटकात केलेला अभिनय, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्यांची विनोदी शैली याचे प्रेक्षक आजही कौतुक करतात.  संदीपनं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यामध्ये  लिहिलं होतं, वऱ्हाड निघालं लंडनला या नाटकाचा पहिला प्रयोग लक्ष्मणराव देशपांडे यांनी 1977 मध्ये केला. त्यांनी या नाटकाचे जगभरात 1960 प्रयोग केले. अमेरिका, इंग्लंडसारख्या शहरांमध्ये देखील लक्ष्मणराव देशपांडे यांनी या नाटकाचे प्रयोग केले. अनेक पुस्कारांनी या नाटकाला गौरवण्यात आलं. 5 डिसेंबर 2012 रोजी वऱ्हाड निघालं लंडनला या नाटकाला पुन्हा रंगमंचावर आणायचे काम संदीप पाठकने केले. आता या नाटकाचा 450 वा प्रयोग आहे. या निमित्तानं संदीपनं एक खास पोस्ट केली आहे.


संदीपची पोस्ट 
संदीपनं त्याचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये संदीपसोबतच लक्ष्मणराव देशपांडे यांचा फोटो देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करुन संदीपनं कॅप्शनमध्ये लिहिलं,  'प्रा. लक्ष्मणराव देशपांडे सरांना वंदन करून सादर करतोय “वऱ्हाड निघालंय लंडनला” प्रयोग क्र. 450. स्थळ- संत एकनाथ रंगमंदीर, संभाजीनगर (औरंगाबाद) आज (रविवार) रात्री 9 वाजता. संभाजीनगर येथील नाट्यप्रेमींना आग्रहाचं आमंत्रण...'






काही दिवसांपूर्वी वऱ्हाड निघालंय लंडनला नाटकाच्या 450 व्या प्रयोबाबत एक पोस्ट संदीपनं सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, 'वऱ्हाड ने मला वेगळी ओळख दिली. पैसा , प्रसिध्दी आणि समाधान या तिन्ही गोष्टी या एकाच कलाकृतीने मला दिल्या. वऱ्हाडचा प्रयोग हा माझ्यासाठी नट म्हणून रियाज आहे. वऱ्हाड माझ्यासाठी शिवधनुष्य होतं, आहे आणि यापुढे सुध्दा राहील. समीर हंपी आणि संदीप सोनार ही दोन सोन्यासारखी माणसं मला वऱ्हाडने दिली. श्रीमती विजया देशपांडे मॅडम ने ज्या विश्वासाने माझ्यावर वऱ्हाडची जबाबदारी दिली त्याची जाणीव मला आहे. 4 डिसेंबर ला हा दशकपूर्ती सोहळा पार पडतो आहे, संभाजीनगर येथील सर्व नाट्यरसिकांना आग्रहाचे आमंत्रण. “समद्या वऱ्हाडाला घेऊन या”






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Entertainment News Live Updates 4 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!