मुंबई - नाट्यगृह चालू करण्यासंबंधी, रसिक प्रेक्षक व नाट्यकर्मी यांची काळजी तसेच रंगभूमीच्या दृष्टिकोनातून उपस्थित होणारे अनेक मुद्दे यावर सविस्तर चर्चा व्हावी या उद्देशाने ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मराठी व्यावसायिक संघाच्या निर्मात्यांची बैठक अलीकडेच "झूम ऍप" द्वारे संपन्न झाली. या बैठकीत 22 नाट्य निर्मात्यांनी आपली मते मांडली.
या बैठकीत सुरुवातीसच विजय केंकरे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने गरजू नाट्यकर्मीना 1 कोटी 20 लाखांची केलेली मदत याबद्दल आभार मानले. तसेच करोना विषाणूंचा नाट्य व्यवसायावर झालेला परिणाम, नाट्य निर्मात्यांपुढे आज जी आर्थिक ओढाताण निर्माण झालीय, त्यातून थोडा दिलासा मिळावा, यासाठी 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबईने आपल्या 28 सदस्यांना नुकतेच प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. उर्वरित गरजू सदस्यांनाही अशाप्रकारे अर्थसहाय्य देण्यात येईल, अशी माहिती प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी यावेळी दिली.
सुशांतसिंह राजपूतचा टीव्ही ते बॉलिवूडचा प्रेरणादायी प्रवास
राज्यातील नाट्यगृह आणि नाट्य प्रयोग सुरू करण्यापूर्वी करावयाच्या उपाय योजना, नाट्य व्यवसायापुढच्या अडचणी लक्षात घेऊन, त्या टाळण्यासाठी ठराव एकमताने मंजूर करून पुढील निर्णय घेण्यात आले.
- महाराष्ट्रातील नाट्यगृहातील कोविड 19 च्या महामारीमुळे थांबलेले नाटकांचे प्रयोग "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ" आणि "अखिल भारतीय मराठी नाटय परिषदे"च्या परवानगीशिवाय सुरु करता येणार नाही. तसेच, या दोन्ही संस्थांच्या परवानगी पत्राशिवाय कोणत्याही नाट्यगृहाच्या तारखा नाट्य निर्मात्यांना दिल्या जाणार नाहीत.
- नाटक सुरु करण्याआधी येणारा प्रेक्षक वर्ग, तंत्रज्ञ आणि कलाकार त्यांच्या करोना आजाराच्या संदर्भात त्यांच्या शारीरिक उपाययोजना काय असतील आणि त्या काय असायला पाहिजेत. यावर मान्यवरांचा सल्ला घेऊनच नाट्यगृहात प्रयोग सादर करावेत.
- सध्या नवीन प्रकार आलेल्या "ओटीटी प्लॅटफॉर्म"मध्ये 10 जून 2020 नंतर कुठल्याही निर्मात्याने नवीन नाटक देऊ नये. (कारण 'ओटीटी प्लॅटफॉर्म' नाट्य व्यवसायासाठी नुकसानकारी आहे.)
हे निर्णय नाट्य व्यवसायाच्या हिताचे असल्याने, त्यांचे पालन नाट्य निर्मात्याप्रमाणेच नाट्यगृहाशी संबंधित सर्व शासकीय व सामाजिक संस्थांनी काटेकोरपणे करावे, असे आवाहन 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा'तर्फे जाहीर करीत आहोत, असे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी संगितले.
या निर्णयाचे ठराव महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्री, महानगरपालिका आयुक्त-मुंबई व पुणे; तसेच उर्वरित महाराष्ट्रातील नाट्यगृह संबंधित शासकीय प्रमुख अधिकारी यांना पाठवण्यात आले आहेत.
Sushant Singh Rajput commits suicide | अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या