Akshaya Naik : सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli)  या छोट्या पडद्यावरील मालिकेमधील लतिका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षया नाईक ही एका दोन अंकी नाटकामध्ये काम करणार आहे. एक खास व्हिडीओ शेअर करुन अक्षयानं तिच्या या नव्या नाटकाची माहिती चाहत्यांना दिली आहे. 


अक्षया नाईकनं नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अक्षय ही  हातात बांडी घालते, डोक्यावर रुमाल बांधते आणि चष्मा घालते. त्यानंतर ती म्हणते, 'आहो, झालं का आवरुन? किती उशीर?नेहमी तुमच्या मुळेच उशीर होतो आपल्याला. आहो, आपल्याला वॉकला जायचंय लग्नाला नाही. माझं झालंय आवरुन, चला आता.'


अक्षया नाईकनं व्हिडीओला कॅप्शन दिलं,'ओळखीचा चेहरा...नव्या भूमिकेत आणि नव्या मंचावर येणार तुम्हाला भेटायला! लवकरच भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट निर्मित,दिलीप प्रभावळकर लिखित,अशोक पत्की यांचं संगीत असणारं दोन अंकी नाटक,लवकरच रंगभूमीवर..'


अक्षया नाईकनं शेअर केलेल्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी तिच्या या नव्या नाटकासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ऋतुजा बागवे, समीर परांजपे, समृद्धी केळकर आणि अदिती द्रविड या कलाकारांनी अक्षयाच्या व्हिडीओला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 


पाहा व्हिडीओ:






अक्षया नाईकच्या (Akshaya Naik) या नव्या नाटकाचं नाव काय असणार आहे? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच या नाटकामध्ये आणखी कोणते कलाकार काम करणार आहेत? हे देखील अजून  गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. आता अक्षयाच्या या दोन अंकी नव्या कोऱ्या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


सुंदरा मनामध्ये भरली  या मालिकेमध्ये अभिनेत्री अक्षया नाईक  (Akshaya Naik) आणि अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) हे कलाकार प्रमुख भूमिका सकारली. या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता अक्षयाच्या नव्या नाटकाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Sundara Manamadhe Bharli: 'सुंदरा मनामध्ये भरली'मधील लतिकानं चालवला ट्रक; व्हिडीओ व्हायरल