Sudarshan Deerghanka Spardha 2023: सुदर्शन दीर्घांक स्पर्धा 2023 (Sudarshan Deerghanka Spardha 2023) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनय या विभागाचे बक्षीस सिमरन सैद (नवरा आला वेशीपाशी), श्रुती मधुदीप (पाच फुटाचा बच्चन), वरद साळवेर (आनंद ओवरी) आणि ऋषभ कांती  (आनंद ओवरी) या कलाकारांनी पटकवालले आहे. 


सुदर्शन दीर्घांक स्पर्धेमध्ये सांघिक प्रथम पारितोषिक आनंद ओवरी या नाटकानं पटकावलं आहे. आनंद ओवरी हे नाटक द ब्लाइंड अँड द एलिफंट या मुंबईतील थिएटर ग्रुपचं आहे. तर सुदर्शन दीर्घांक स्पर्धेतील सांघिक द्वितीय परितोषिक पाच फुटाचा बच्चन या नाटकानं पटकावलं आहे. तसेत तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस नवरा आला वेशीपाशी या नाटकानं पटकावलं आहे. 30 एप्रिल 2023 रोजी सुदर्शन दीर्घांक स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ 30 एप्रिल रोजी पार पडला. 






सुदर्शन दीर्घांक स्पर्धेमधील सर्वोत्कृ्ष्ट प्रकाश योजनेचं बक्षीस सचिन लेले यांनी पटकावलं आहे. तर सर्वोत्कृष्ट संगीत या विभागाचं बक्षीस तन्मय भिडे यांनी जिंकलं आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या विभागातील प्रथम पुरस्कार हा गोरीष खोमानी यांनी पटकावला आहे तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन विभागातील द्वितीय पुरस्कार यश नवले आणि राजकत्न भोजने यांनी पटकावला आहे. 


पाच फुटाचा बच्चन या नाटकानं सुदर्शन दीर्घांक स्पर्धा 2023 मधील दोन बक्षीसं पटकावली आहेत.   गावाखेड्यातून आलेल्या एका सुपरस्टारच्या आयुष्यावर भाष्य करणारं 'पाच फुटाचा बच्चन' हे नाटक आहे. एक सर्वसामान्य मुलगा ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात येणारं वादळ अशा अनेक गोष्टी या नाटकात दाखवण्यात आल्या आहेत. हे नाटक पाहताना प्रेक्षक हसता-हसता अंतर्मुख होतो. कौस्तुभ देशपांडेने हे नाटक लिहिलं असून श्रुती मधुदीपने या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पाच फुटाचा बच्चन या नाटकानं बक्षीस जिंकल्यानंतर अभिनेत्री श्रुती मधुदीपनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला.






महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Paach Futacha Bacchan : 'पाच फुटाचा बच्चन'च्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद; गावखेड्यातून आलेल्या सुपरस्टारच्या गोष्टीची नाट्यरसिकांना भुरळ