Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी' (Sangeet Devbabhali) हे मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक आहे. पाच वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या या नाटकाची आजही क्रेझ कायम आहे. या नाटकाचे आजही हाऊसफुल प्रयोग पार पडत आहेत. पण आता हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
'संगीत देवबाभळी'चे (Sangeet Devbabhali) दोन टप्प्यात 'शेवटचे काही प्रयोग' पार पडणार असल्याचं आधी सांगण्यात आलं होतं. पहिला टप्पा म्हणजे तुकाराम बीज ते आषाढी एकादशी आणि दुसरा आणि शेवटचा टप्पा म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी. आता आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'संगीत देवबाभळी'च्या शेवटच्या प्रयोगाची नेमकी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीदरम्यान महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात 'संगीत देवबाभळी' या नाटकाचे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात शेवटचे प्रयोग होणार आहेत. नाटक बंद करू नका असा प्रेक्षकांचा आग्रह आहे. पण निरोपाचा दिवस सांगून ठेवला तर निरोप जड जात नाही, असं म्हणत या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
'संगीत देवबाभळी'चा शेवटचा प्रयोग कधी पार पडणार?
'संगीत देवबाभळी' या रंगभूमीवरील बहुचर्चित नाटकाचा शेवटचा प्रयोग खूपच खास असणार आहे. कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 22 नोव्हेंबर बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात संध्याकाळी 6.30 वाजता या नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडणार आहे.
रखुमाई आणि संत तुकाराम महाराजांची पत्नी आवली यांच्यातील संवाद रसिकांसमोर मांडणाऱ्या 'संगीत देवबाभळी' या नाटकात शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी मुख्य भूमिकेत आहेत. 'संगीत देवबाभळी' हे नाटक मराठी रंगभूमीवरील सर्वाधिक पुरस्कार प्राप्त नाटक आहे. या नाटकाचं दिग्गजांनीदेखील कौतुक केलं आहे.
भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या 'संगीत देवबाभळी' या नाटकाचे नैपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी केलं आहे. तर संगीत आनंद ओक यांनी केलं आहे. प्रफ्फुल्ल दिक्षीत यांने प्रकाशयोजना केली आहे. सध्या या नाटकाचे रंगभूमीवर जोरदार प्रयोग सुरू आहेत. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
संबंधित बातम्या