Bharat Jadhav: नाटक मालिका आणि चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या भरत जाधवनं (Bharat Jadhav) प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. भरत जाधवनं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. भरत हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. जाणून घेऊयात भरतच्या बालपणाबद्दल तसेच त्याच्या चित्रपट आणि नाटकांबद्दल...
एका मुलाखतीमध्ये भरत जाधवनं सांगितलं होतं की त्याचे वडील हे टॅक्सी चालवत होते. तो म्हणाला होता, 'माझं बालपण मुंबईमध्येच गेलं. वडील आधी एका वकिलांकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. नंतर ते टॅक्सी चालवायचे. महाराष्ट्राची लोकधारामध्ये मी काम करण्यास सुरुवात केली. शाहीर साबळेंच्या ग्रुपमध्ये मी काम केलं. केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि मी असा आमचा ग्रुप झाला.'
भरत जाधवनं पुढे सांगितलं, 'मी रोज सकाळी वडिलांना टॅक्सी धुवून द्यायचं काम करायचो. मी कुठेही नाटकाचे शो केले तर रोज सकाळी वडिलांना टॅक्सी धुवून द्यायचो. एकादा माझा लोकधारा हा कार्यक्रम बघायला माझे कुटुंब आले होते. तेव्हा तो कार्यक्रम बघून आल्यानंतर माझे वडील मला म्हणाले होते. कुठे होतास तू आम्हाला तू दिसलाच नाहीस'
भरतनं या नाटकांमध्ये केलं काम
भरतनं अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. आमच्या सरखे आम्हीच, ऑल द बेस्ट, सही रे सही, तू तू मी मी, श्रीमंत दामोदर पंत या नाटकांमध्ये भरतनं प्रमुख भूमिका साकारली. श्रीमंत दामोदर पंत या नाटकात गोड गोजिरी लाज लाजरी हे गाणं म्हणत भरतनं रंगमंचावर एन्ट्री केली की, प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करायचे. तसेच मोरुची मावशी या नाटकाचे प्रयोग भरतनं अमेरिकेत देखील केले. मराठी नाटक क्षेत्रात भरतनं विशेष ओळख निर्माण केली आहे.
भरत जाधवचे चित्रपट
भरतच्या अगं बाई अरेच्चा!, जत्रा,पछाडलेला या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच भरतनं वास्तव या हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केलं. तसेच बकुळा नामदेव घोटळे, साडे माडे तीन, येड्यांची जत्रा या चित्रपटांमधील भरतच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
संबंधित बातम्या
Bharat Jadhav : "रत्नागिरीत पुन्हा प्रयोग करणार नाही"; भरत जाधवने हात जोडत प्रेक्षकांची मागितली माफी