Rang Maza Vegla Latest Update : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. मालिकेचं कथानक 14 वर्ष पुढे गेल्याने अनेक गोष्टी बदलल्या आहेत. मालिकेचा हिरो कार्तिक आता खलनायकाच्या भूमिकेत आहे. दरम्यान मालिकेत आता आयेशाची एन्ट्री झाली असून तिच्या एन्ट्रीने प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. त्यामुळे आता मालिकेवरदेखील टीका होत आहे.


मालिकेत कार्तिक, कार्तिकी, श्वेता दीपाच्या विरोधात दाखवण्यात आले आहेत. आता यात आयेशाचीदेखील भर झाली आहे. 14 वर्षांनंतर आयशाची रि-एन्ट्री झाली असून तिलं लग्न झालेलं दाखवण्यात आलं आहे. आता आयशाचं लग्न नक्की कोणासोबत झालं आहे याची चाहत्यांनी उत्सुकता लागली आहे. आयेशाच्या एन्ट्रीने दीपा-कार्तिकच्या नात्यात दुरावा येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


प्रेक्षक नाराज...


'रंग माझा वेगळा' या मालिकेतील नवा ट्वीस्ट प्रेक्षकांना खटकला आहे. नेटकरी कमेंट्स करत आपली नाराजी व्यक्त करत आहेत. बंद करा ही मालिका, किती ड्रामा दाखवणार, भंगार मालिका, संसाराची वाट लावायची असेल त्याने ही मालिका पाहावी, सुखी आयुष्य उद्ध्वस्त करणारी मालिका, आधीच व्हिलन कमी आहेत का? अशा कमेट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 






टीआरपीच्य शर्यतीत बाजी मारलेली 'रंग माझा वेगळा' 


'रंग माझा वेगळा' ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण आजही या मालिकेची लोकप्रियता कमी झालेली नाही. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका अव्वल ठरली आहे. अनेकदा टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या क्रमांकावर असले. 


विदिशा म्हसकरचं चाहत्यांकडून कौतुक


'रंग माझा वेगळा' या मालिकेत विदिशा म्हसकरने आयेशा हे पात्र साकारले आहे. विदिशाच्या या भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. विदिशाने काही दिवसांपूर्वी 'रंग माझा वेगळा' या मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती 'छत्तीस गुणी जोडी' या मालिकेत दिसली. या मालिकेतदेखील ती नकारात्मक भूमिकेत दिसून आली होती. आता पुन्हा 'रंग माझा वेगळा' या मालिकेत तिची रि-एन्ट्री झाली आहे. 


संबंधित बातम्या


Marathi Serial : 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; 'रंग माझा वेगळा' पडली मागे