Jar Tarchi Goshta: अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) यांच्या 'जर तरची गोष्ट' (Jar Tarchi Goshta) या नाटाकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या नाटकाचे अनेक प्रयोग हाऊसफुल झाले. आता 'जर तरची गोष्ट' या नाटाकाची टीम ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर निघाली आहे. 'जर तरची गोष्ट' या नाटाकामधील कलाकार आता ऑस्ट्रेलियामधील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.


'जर तरची गोष्ट' या नाटाकाची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निघाली आहे.  नुकतीच 'जर तरची गोष्ट' या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या नाटकाच्या प्रयोगांची माहिती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामधील सिडनी आणि मेलबर्न येथे 'जर तरची गोष्ट' या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सिडनी येथे शनिवारी ( 7 ऑक्टोबर) आणि मेलबर्न येथे रविवारी (8 ऑक्टोबर) 'जर तरची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग होणार आहे.


‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचा  शुभारंभ प्रयोग देखील  ‘हाऊसफुल्ल’ झाला होता.अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar), रणजित पाटील (Ranjit Patil)  यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केलं आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्यासोबतच पल्लवी अजय (Pallavi Ajay), आशुतोष गोखले (Aashutosh Gokhale)  यांनी देखील या नाटकामध्ये काम केलं आहे.






 'नवा गडी नवं राज्य' या नाटकामध्ये प्रिया आणि उमेश यांनी काम केलं. तसेच  'टाईम प्लीज' या चित्रपटामधून देखील ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. आता सध्ये हे दोघे ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.






2011 मध्ये प्रिया आणि उमेश यांनी लग्नगाठ बांधली. ​प्रियानं शुभंकरोती, अधुरी एक कहानी आणि दामिनी या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सिटी ऑफ ड्रिम्स या वेब सीरिजमधील प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तर उमेशनं आभाळमाया, वादळवाट या मालिकांमध्ये आणि अजब लग्नाची गजब गोष्ट आणि क्षणोक्षणी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


संबंधित बातम्या:


Jar Tarchi Goshta : प्रिया बापट-उमेश कामतच्या 'जर तर ची गोष्ट' नाटकाने रंगभूमी बहरली; आतापर्यंतचे सगळे प्रयोग 'हाऊसफुल्ल'