Phirse Honeymoon: अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) आणि अभिनेता संदेश कुलकर्णी (Sandesh Kulkarni) यांच्या पुनःश्च हनिमून या नाटकानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता हिंदी भाषेमधून हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. काही दिवसांपूर्वी पृथ्वी थिएटरमध्ये फिरसे हनिमून (Firse Honeymoon) या नाटकाचा प्रयोग झाला. अनेक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी हा प्रयोग पाहिला. त्यानंतर या कलाकारांनी या नाटकाचं कौतुक केलं.


 नवाजुद्दीन सिद्दीकीनं 'फिरसे हनिमून' नाटकाचं केलं कौतुक


'फिरसे हनिमून' नाटक पाहिल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) म्हणाला, 'फिरसे हनिमून या नाटकातील  कलाकारांचा परफॉर्मन्स लक्ष वेधतो. संदेश आणि अमृता यांनी चांगलं काम केलं आहे. मला खूप मजा आली.'






अभिनेत्री विद्या बालननं (Vidya Balan) देखील या नाटकाचं कौतुक केलं आहे. ती म्हणाली, 'खूप छान नाटक आहे. मी बऱ्याच दिवसांनी नाटक पाहिलं, ते पण पृथ्वी थिएटरमध्ये. मला खूप छान वाटलं.अमृता सुभाष मला खूप आवडते. हे नाटक हसवतं, रडवतं. एवढं मजेशीर नाटक मी खूप दिवसांनी पाहिलं. हे नाटक नक्की बघा.' आर. बाल्की, अर्चना पूरन सिंह, गौरी शिंदे यांनी देखील या नाटकाचं कौतुक केलं आहे.






29 आणि 30 जुलै रोजी देखील पृथ्वी थिएटरमध्ये फिरसे हनिमून या नाटकाचा प्रयोग झाला. पुनःश्च हनिमून या मराठी नाटकाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली आता या नाटकाच्या हिंदी व्हर्जनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.


अमृतानं वळू, श्वास, विहीर, हापूस,किल्ला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच गल्ली बॉय या हिंदी चित्रपटामुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली.  सेक्रेड गेम्स-2, बॉम्बे बेगम्स आणि सास बहू आचार प्रा. ली या वेब सीरिजमधील अमृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.  काही दिवसांपूर्वी अमृताची लस्ट स्टोरीज-2 ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Amruta Subhash: 'त्यानं मला विचारलं, तुझ्या मासिक पाळीची तारीख...' ; अमृतानं सांगितला सेक्रेड गेम्स-2 मधील इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वीचा अनुभव