Marathi Natak : राज्य सरकारने नाट्यगृहे अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या नियमांचे पालन करत राज्यात सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरू झाली आहेत. कोरनाकाळात लोकांना अत्यंत वाईट दिवस बघावे लागले होते. त्यामुळे प्रेक्षकांना आता आनंदीत ठेवण्यासाठी रंगभूमीवरदेखीन विनोदी नाटकं आली आहेत. सध्या रंगभूमीवर विनोदी नाटकांची जत्रा पाहायला मिळत आहे. 


'धनंजय माने इथचं राहतात', 'आमने-सामने', 'अलबत्या गलबत्या', 'एका लग्नाची पुढची गोष्ट', 'दादा एक गुड न्युज आहे', 'सुनेच्या राशीला सासू', 'पुन्हा सही रे सही', 'तू म्हणशील तसं', 'व्हॅक्यूम क्लीनर' आणि 'नवरा माझा भवरा' ही विनोदी नाटकं सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. तर दुसरीकडे 'चार्ली', 'कुर्रर्रर्र', 'वन्स मोअर तात्या', 'भावाला जेव्हा जाग येते', 'संगीत शोले' ही आगामी नाटके लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रंगभूमीवर दाखल होणार आहेत.  


एकाचवेळी दुहेरी भूमिका
रंगभूमीचा पडदा उघडल्याने नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. त्यामुळे मालिकांमधील चेहरे आता पुन्हा एकदा रंगभूमीवर दिसू लागले आहेत. एकाचवेळी मालिका आणि नाटक करताना कलाकार मंडळी दिसून येत आहेत. यासाठी कलाकारांनी योग्य वेळापत्रकाची आखणी केली आहे. निर्मातेदेखील कलाकारांना सांभाळून घेत आहेत. 


गेल्या पावणेदोन वर्षांत मराठी रंगभूमीवरील पडद्यामागचे कलावंत, तंत्रज्ञ यांच्यावर वाईट दिवस आले होते. त्यांना अनेक संस्था आणि व्यक्तींनी मदत केली होती. सिने-नाट्यगृहे सुरू होत असल्याने अनेक बड्या कलाकारांपासून पडद्यामागच्या कलाकारांपर्यंत सगळेच खूश आहेत. प्रेक्षकदेखील गेले अनेक दिवस ओटीटी, टीव्ही माध्यमातील कार्यक्रम बघून कंटाळले होते. त्यामुळे आता प्रेक्षकांना दर्जेदार कंटेंटचा आस्वाद घेता येणार आहे. अनलॉकनंतर अनेक क्षेत्रांना मुभा देण्यात आली होती. पण नाट्यगृहाचा पडदा उघडण्यास ठाकरे सरकारने मज्जाव केला होता. त्यानंतर अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान त्यांनी ठाकरे सरकार विरोधात आंदोलने केली होती. 


संबंधित बातम्या


सिनेनाट्य रसिकांना दिवाळी भेट, सिनेमागृहे आणि नाट्यगृहे आजपासून सुरू


Shubhangi Gokhale : अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक