Marathi Natak : कोरोना काळात बंद असलेली नाट्यगृहे 22 ऑक्टोम्बर पासून सुरू करण्यात आली आहेत. नाट्यगृह सुरू करताना कोरोनाचे नियम व अटी घालून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाट्यगृह सुरू करण्यात आली होती. 23 तारखेला 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या प्रशांत दामलेंच्या नाटकाचा पहिला प्रयोग सावित्रीबाई फुले रंग मंदिरात झाला होता.
आज पर्यंत केडीएमसी च्या दोन्ही नाट्यगृहात झालेल्या नाट्य प्रयोगांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असला तरी नाट्यगृहे हाऊसफुलच्या प्रतीक्षेत होती. आज डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंग मंदिरात 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाचा प्रयोग हाऊस फुल्ल झाला. तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या नाट्यगृहाबाहेर हाऊस फुल्ल चा बोर्ड झळकला. मुंबई व आसपासच्या उपनगरांमध्ये डोंबिवली ने आज हाउसफुल चा मान मिळवला.
दरम्यान नाटक पाहण्यासाठी आलेल्या नाट्यरसिकांनी देखील आनंद व्यक्त केला. हे नाटक पाहण्यासाठी कल्याण डोंबिवलीच नव्हे तर ठाणे नवी मुंबई ,येथून रसिक आले होते. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि उमेश कामत, ऋता दुर्गुळे,आशुतोष गोखले,आरती मोरे यांनी हाऊस फुल्ल चा बोर्ड झळकावला. दरम्यान उमेश कामत व नाटकाच्या संपूर्ण टीम ने नाट्यरसिकांचे आभार मानले.
गेल्या पावणेदोन वर्षांत मराठी रंगभूमीवरील पडद्यामागचे कलावंत, तंत्रज्ञ यांच्यावर वाईट दिवस आले होते. त्यांना अनेक संस्था आणि व्यक्तींनी मदत केली होती. सिने-नाट्यगृहे सुरू होत असल्याने अनेक बड्या कलाकारांपासून पडद्यामागच्या कलाकारांपर्यंत सगळेच खूश आहेत. प्रेक्षकदेखील गेले अनेक दिवस ओटीटी, टीव्ही माध्यमातील कार्यक्रम बघून कंटाळले होते. त्यामुळे आता प्रेक्षकांना दर्जेदार कंटेंटचा आस्वाद घेता येणार आहे.
आगामी विनोदी नाटकेचार्ली', 'कुर्रर्रर्र', 'वन्स मोअर तात्या', 'भावाला जेव्हा जाग येते', 'संगीत शोले' ही आगामी नाटके लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रंगभूमीवर दाखल होणार आहेत.
संबंधित बातम्या
Marathi Natak : मराठी रंगभूमीवर विनोदी नाटकांची जत्रा
Shubhangi Gokhale : अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे फेसबुक अकाऊंट हॅक
Antim Release : थिएटरमध्ये आतिषबाजीनंतर आता Salman Khan च्या पोस्टरवर दूधाचा अभिषेक, व्हिडीओ होतोय व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha