Charcha Tar Honarach: मराठी रंगभूमीवरील एका नाटकाची दखल परदेशात घेतली जाणार आहे. अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar ) , आस्ताद काळे (Aastad Kale) , आणि क्षितिज झारापकर यांचं चर्चा तर होणारच (Charcha Tar Honarach) या नाटकाच्या प्रयोगांना परदेशातील नाट्य रसिकांकडून नाटकाच्या प्रयोगासाठी खास आमंत्रण देण्यात आलं आहे. अमेरिका, सिंगापूर, दुबई येथील महाराष्ट्र मंडळाकडून हे आमंत्रण देण्यात आलं आहे. 


नाटकाचे अधिकाधिक प्रयोग परदेशात व्हावे अशी इच्छा परदेशातील नाट्यरसिक व्यक्त करत आहेत. परस्पर विचारसरणीच्या विरोधात दंड थोपटून उभ्या असलेल्या दोन कार्यकर्त्यांची गोष्ट या नाटकात आहे . एका सामाजिक पुरस्काराच्या निमित्ताने मुद्दाम झडविल्या गेलेल्या वैचारिक जुगलबंदीत कोण, कसे डावपेच खेळतात याची रंगतदार मांडणी केलेलं नाटकं म्हणजे ‘चर्चा तर होणारच!’


लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी ‘चर्चा तर होणारच!’ या नाटकाद्वारे सद्य: परिस्थितीवर भाष्य करत घडवून आणलेली चर्चा विचारमंथन करायला भाग पाडते. अदिती सारंगधर, आस्ताद काळे, आणि क्षितिज झारापकर यांनी आपल्या सशक्त अभिनयाने  या नाटकाला चारचाँद लावले आहेत.






रंगनील आणि वेद प्रॉडक्शन्स निर्मित आणि आर्या व्हिजन प्रस्तुत हे नाटक सध्या तुफान गाजतंय. मुंबई पुण्यातल्या प्रयोगांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. लवकरच कोकण दौरा आयोजित केला जाणार आहे. कल्पना कोठारी आणि विनय अलगेरी या नाटकाचे निर्माते आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Charcha Tar Honarach : चर्चेत राहण्यासाठी आम्हाला सिर्फ नाम ही काफी हैं... 'चर्चा तर होणारच'; आदिती आणि आस्ताद सात वर्षांनी पुन्हा एकत्र