The Kashmir Files : अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) स्टारर 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला आहे. चित्रपट रिलीज होऊन 17 दिवस उलटलेट, तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ कायम आहे. या चित्रपटामुळे लोक थिएटर्सकडे वळत आहेत. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवत चित्रपटाच्या जागतिक बॉक्स ऑफिस कलेक्शनने 250 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा हा तिसरा आठवडा आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांचा चित्रपट 'द काश्मीर फाइल्स' 250 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाल्याचे सांगितले आहे.


250 कोटी हे या चित्रपटाचे वर्ल्ड वाईड कलेक्शन आहे. या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, या चित्रपटाने 252.45 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. तिसऱ्या रविवारी भारतात 7 कोटी 60 लाख रुपये आणि परदेशात 2.15 कोटी रुपये कमावले.’ विवेक अग्निहोत्रींनी या पोस्टसोबत हात जोडल्याचे इमोजी शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.


पाहा पोस्ट :



दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट 11 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अमानुष छळाचे चित्रण करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना भावूक करत आहे. या चित्रपटात पल्लवी जोशी (Pallavi Joshi), दर्शन कुमार (Darshan Kumaar), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraboty), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि अनुपम खेर (Anupam Kher) या कलाकारांच्या अभिनयाने रसिकांना अक्षरशः रडवले आहे.


बहुप्रतीक्षित ‘RRR’ हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत कुठेतरी त्याचा ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलेक्शनवर परिणाम झाला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट केले होते की, 'द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या कलेक्शनवर RRR चित्रपटामुळे परिणाम झाला आहे. आरआरआरच्या स्क्रीन्स वाढल्या आहेत, त्यामुळे चित्रपटाला अधिक जागा मिळाली आहे.


 





विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाचा आशय इतका सशक्त आहे की, या चित्रपटासमोर अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फारसे लक्ष दिले नाही. अशा परिस्थितीत खुद्द अक्षय कुमारने 'द कश्मीर फाइल्स'चे कौतुक केले. विवेक अग्निहोत्रींनी देखील या कौतुकावर हात जोडून अक्षय कुमारचे आभार मानले.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha