The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करून इतिहास रचला आहे. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बुधवारी 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. 2020 आणि 2021मध्ये, ‘द काश्मीर फाइल्स’ हा कोरोना व्हायरस साथीच्या काळातही सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, त्यानंतर अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ दुसऱ्या स्थानावर आहे.
‘द काश्मीर फाइल्स’चे हे यश हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हे निश्चितच महत्त्वाचे आहे. कारण, कमी बजेट आणि बिग बजेट कलाकार नसतानाही या चित्रपटाने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, ‘The Kashmir Files’ने बुधवारी, रिलीजच्या 13व्या दिवशी 10.03 कोटी कमावले आहेत, ज्यासह चित्रपटाचे 13 दिवसांचे एकूण कलेक्शन आता 200.13 कोटींवर गेले आहे. यापूर्वी या चित्रपटाने मंगळवारपर्यंत 190.10 कोटी कमावले होते आणि 200 कोटींसाठी फक्त 9.90 कोटींची गरज होती.
दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचा धडाकेबाज प्रवास!
‘द कश्मीर फाइल्स’ दुसऱ्या आठवड्यातही जोरदार कमाई करत आहे. दुसऱ्या वीकेंडमध्ये ‘बच्चन पांडे’सारखा मोठा चित्रपट असूनही ‘द काश्मीर फाइल्स’ने चांगला व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी 19.15 कोटी, शनिवारी 24.80 कोटी आणि रविवारी 26.20 कोटी कमावले होते. यानंतर, चित्रपटाने दुसऱ्या सोमवारी 12.40 कोटी आणि मंगळवारी 10.25 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने 12 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 190.10 कोटींची कमाई केली होती. आणि अवघ्या 13व्या दिवशी 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करतो. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा :
- Oscar 2022 : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा करणार ऑस्करच्या प्री इव्हेंटचे सूत्रसंचालन
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ला मिळणार होता गानकोकीळा लतादीदींचा आवाज, पण..., विवेक अग्निहोत्रीने केला खुलासा
- The Kashmir Files Box Office Collection Day 12: बिग बजेट चित्रपटांना धोबीपछाड, ‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच गाठणार 200 कोटींचा पल्ला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha