India’s non-dollar forex assets : परकीय गंगाजळात विविधता आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पावले उचलण्या सुरुवात केली आहे.  भारताच्या परकीय गंगाजळीत डॉलरशिवाय असलेल्या इतर परकीय गंगाजळीचा राखीव साठा हा 30 ते 40 टक्के इतका असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सुरू असलेल्या भू-राजकीय परिस्थितीमुळे विविध परकीय राखीव चलनांच्या साठ्याच्या महत्त्वाला अधोरेखित केली आहे. भारताताकडून डॉलर, युरो, पौंड, येन या चार परकीय चलनाला अधिक महत्त्व दिले जात आहे. 


रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, सुमारे सहा महिन्यांपूर्वी डॉलरशिवाय इतर राखीव परकीय गंगाजळीच्या मालमत्तेत विविधता आणण्यास सुरुवात केली. कोणत्याही एका चलनात परकीय गंगाजळी नसल्याचे त्यांनी म्हटले. 


भारताच्या परकीय चलन साठ्याच्या संरचनेबद्दल रिझर्व्ह बँक डेटा जारी करत नाही. डॉलरशिवाय असलेल्या परकीय गंगाजळीबाबत माहिती घेण्यासाठी इतर विश्लेषणात्मक माहितीचा आधार घेतला जातो. इतर चलनांच्या तुलनेत डॉलरच्या मूल्यात असलेली तफावत पाहून अंदाज व्यक्त केला जातो, असे . एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चरमधील सहाय्यक प्राध्यापक अनंत नारायण यांनी सांगितले. नारायण यांच्या दाव्यानुसार, गेल्या तीन वर्षात रिझर्व्ह बँकेने 200 अब्ज डॉलरची खरेदी केली आहे.  


बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, भारताने आपल्या साठ्यात विविधता आणण्याचे कोणतेही राजकीय कारण नाही. मात्र, जगात अराजक परिस्थिती उद्भवते तेव्हा देशातील परकीय चलनाचा साठा एका चलनात ठेवला जात नाही. डॉलर, पौंड, युरो आणि येन चार मजबूत चलनाकडे ओढा असला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. चीनकडून युआनला डॉलरप्रमाणे आंतरराष्ट्रीय चलन म्हणून उभं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, एखाद्या दिवशी चीनने आक्रमक कृती केली आणि निर्बंध लादले तर समस्या उद्भवू शकतात असेही त्यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha