The Kapil Sharma Show New Season : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा आपल्या विनोदांनी सर्वांना हसविण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण कपिलचा 'द कपिल शर्मा शो'च्या (The Kapil Sharma Show) नवीन सीझनला आजपासून सुरुवात होणार आहे. कपिल शर्माने 2016 मध्ये सोनी टीव्हीवर त्याचा शो सुरू केला आणि तेव्हापासून हा शो प्रेक्षकांना खळखळून हसविण्याचे काम करत आहे. कपिलच्या शो चे चाहते नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहात होते. आता प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपणार आहे. हा शो जरी कॉमेडी असला तरी नवीन सीझनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल कोणते ते पाहूयात. 


'द कपिल शर्मा शो' कधी आणि कुठे पाहाल?


कपिल शर्माचा लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' 10 सप्टेंबर 2022 पासून दर शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. तुम्ही त्याचे एपिसोड OTT प्लॅटफॉर्म SonyLIV वर देखील पाहू शकता. शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), आभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि अभिनेत्री सरगुन मेहता (Sargun Mehta) हे 'कठपुतली' (Cuttputlli) चित्रपटातील कलाकार दिसणार आहेत.  






'द कपिल शर्मा शो'ची नवीन स्टार कास्ट


नवीन कपिल शर्मा शोच्या सीझनमध्ये नवीन चेहरे दिसणार आहेत. अलीकडेच, सोनी टीव्हीने द कपिल शर्मा शोच्या आगामी सीझनसाठी स्टार कास्ट आणि त्यांच्या पात्रांची माहिती दिली. या शोमध्ये कपिल शर्मा (कप्पू शर्मा), सुमोना चक्रवर्ती (कपिलची पत्नी बिंदू), किकू शारदा (स्थानिक धोबन गुडिया), सृष्टी रोड (गझल), सिद्धार्थ सागर (उस्ताद), गौरव दुबे, इश्तियाक खान, श्रीकांत मस्की यांसारखे कलाकार दिसणार आहेत. त्याचबरोबर अर्चना पूरण सिंह या शोची जज म्हणून दिसणार आहे.


 






'या' कलाकारांनी सोडला कपिल शर्मा शो :


या सीझनमध्ये अनेक विनोदी कलाकार आहेत, जे यापुढे दिसणार नाहीत. अली असगर आणि सुनील ग्रोव्हर आधीच शोमधून बाहेर पडले होते. आता नव्या सीझनमध्ये कृष्णा अभिषेक आणि चंदू उर्फ ​​चंदन प्रभाकरही बाहेर आहेत. त्याचबरोबर भारती सिंग देखील शोमध्ये फार कमी वेळा दिसणार आहे. ती लवकरच 'सा रे ग म प लिल चॅम्प्स' होस्ट करणार आहे.


महत्वाच्या बातम्या :