Nashik Ganshotsav : नाशिक (Nashik) गणेश विसर्जन (Ganesh Immersion) मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. रात्री बारा वाजता मिरवणूक गोदाघाटावर आल्यानंतर डीजेचा (DJ) दणदणाट बंद झाला. त्यानंतर राहिलेल्या गणेश मंडळांना पोलिसांनी (Nashik Police) हळूहळू विसर्जन स्थळी आणून शांततेत विसर्जन पार पडले.
कोरोनाच्या (Corona Update) दोन वर्षाच्या कालखंडानंतर गणेश उत्सवाचा (Ganesh Utsav) पूर्णपणे आनंद घेत गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा केला. मात्र काही ठिकाणी या उत्साहाला गालबोट लागल्याचंही पाहायला मिळालं. गेले दहा दिवस संपूर्ण राज्यभर एकच जयघोष होता. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये देखील दोन वर्षानंतर गणपती बाप्पाचा उत्सव चैतन्यमय वातावरणात पार पडला. सकाळी अकरा वाजता सुरु झालेली मिरवणूक रात्री बारावाजेपर्यत ही मिरवणूक शांततेत सुरु होती. शेवटी बाराच्या ठोक्याला मिरवणूक बंद झाली. पोलिसांच्या सूचनेनुसार मंडळांनी डीजे बंद करून शांततेत विसर्जन झाले.
काल सकाळपासून सुरु झालेला विसर्जन सोहळा रात्री उशीरापर्यंत सुरु होता. मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी गणपती विसर्जित झाले. तर काही गणपतीच्या मिरवणुका रात्रभर सुरु होत्या, ज्या सकाळी विसर्जित झाल्या. राज्यात बऱ्याच ठिकाणी रात्री 12च्या आता विसर्जन मिरवणुका संपल्या. मात्र काही ठिकाणी नियमांचं उल्लंघन करत रात्री 12 वाजेनंतरही डीजेच्या दणदणाटासह मिरवणुका सुरु होत्या. कोल्हापूर, नाशिक, साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजता डीजेचा दणदणाट बंद करण्यात आला. तर पुण्यात 12 नंतरही डीजे सुरु होता. मुंबई शांततेत विसर्जन मिरवणुका पार पडल्या. 80 टक्के पोलिस फोर्स गणेश विसर्जनासाठी रस्त्यावर असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
दरम्यान यंदाच्या मिरवणुकीत 2500 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याने मिरवणुकीला कुठेही गालबोट लागले नाही. पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाटा मिरवणुक मार्गावर तैनात होता. नाशिकमध्ये देखील दोन वर्षानंतर गणपती बाप्पाचा उत्सव चैतन्यमय वातावरणात पार पडला. सकाळी अकरा वाजता सुरु झालेली मिरवणूक रात्री बारावाजेपर्यत ही मिरवणूक शांततेत सुरु होती. रात्री बाराच्या ठोक्याला साऊंड सिस्टीम आणि ढोल वादन गणेश मंडळांनी बंद केले.
पावणे दोन लाखांहून अधिक मूर्तीचे संकलन
नाशिक गणेश विसर्जन मिरवणुकीत महापालिकेकडून विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. या केंद्राच्या माध्यमातून सहाही विभागातून नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला असून एकूण 1 लाख 77 हजार 403 मूर्तीचे संकलन करण्यात आले.