The Indrani Mukherjee Story :  'शिना बोरा' (Sheena Bora) हत्या प्रकरणावर आज प्रदर्शित होणाऱ्या 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'चं (The Indrani Mukherjee Story) प्रदर्शन हायकोर्टाकडून (Mumbai High Court) थांबवण्यात आलं आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा नेटफ्लिक्सला (Netflix) दणका मिळाला आहे. तसेच हायकोर्ट, सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी विशेष स्क्रीनिंग करण्याचे निर्देशही नेटफ्लिक्सला देण्यात आले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजूष देशपांडे यांच्यापुढे ही सुनावणी झाली. या डॉक्युमेंट्रीमुळे या प्ररकणात सुरु असलेल्या खटल्यावर परिणाम होईल, असा आक्षेप सीबीआयकडून घेण्यात आला. 


तसेच स्पेशल स्क्रिनिंग केल्यानंतर पुढील गुरुवारी म्हणजेच 29 फेब्रुवारी रोजी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. सध्या सीबीआय कोर्टात हा खटला सुरु आहे. जवळपास या प्रकणात 237 ,साक्षीदार आहेत आणि आतापर्यंत 78 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. तसेच या वेबसिरिजचा उर्वरित साक्षीदारांवर परिणाम होऊ शकतो, असा देखील युक्तिवाद सीबीआयकडून करण्यात आला आहे. या वेब सिरिजमध्ये आरुषी तलवार हत्या प्रकरणाचा देखील दिलासा देण्यात आलाय.


सुनावणी सुरु असताना हे दाखवणं अयोग्य


 एखादी व्यक्ती मुख्य आरोपी असताना, ती इनोसंट असल्याचं दाखवणं तेही त्या प्रकणावर सुनावणी सुरु असताना हे अयोग्य आहे. त्यामुळे ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित होण्याआधी ती पाहणं आवश्यक असल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलं आहे.  दरम्यान या डॉक्युमेंट्रींचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. पण सध्या ट्रेलर देखील उपलब्ध नाही. 


शिना बोरा हत्या प्रकरण 


24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानं दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली. त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. इंद्राणीनं वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयनं कटात सहभागी असल्यानं पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला होता. 


ही बातमी वाचा : 


Rhea Chakraborty : रिया आणि शौविक चक्रवर्तीला हायकोर्टाचा मोठा दिलासा, तपासयंत्रणेनं बजावलेली लुक आऊट नोटीस रद्द