Tharla Tar Mag:  छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग (Tharla Tar Mag) या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली हा अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.  या भूमिकेसाठी त्याने तब्बल 17 किलो वजन कमी केलं आहे. ठरलं तर मग मालिकेतील भूमिकेबाबत अभिनेता अमित भानुशाली यानं सांगितलं. तो म्हणाला, ठरलं तर मग मालिकेत मी अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. ही भूमिका साकारण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. आता पर्यंत मी रोमँटिक हिरोची भूमिका साकार प्रवाहसोबत मी मन उधाण वाऱ्याचे ही मालिका केली होती. 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करताना प्रचंड आनंद होत आहे. रली आहे. या मालिकेतील पात्र आजवर साकारलेल्या भूमिकांच्या पूर्णपणे वेगळं आहे. अर्जुन एक नामांकित वकील आहे. खूप कमी बोलणारा आणि कडक शिस्तीचा. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारताना माझी कसोटी लागतेय. आमचे दिग्दर्शक सचिन गोखले मला हे पात्र उभं करण्यासाठी खूप मदत करत आहेत. स्टा


मालिकेचं नाव आहे ठरलं तर मग तुझ्या आयुष्यातला ठरलं तर मग क्षण कोणता आहे?


ठरलं तर मग हे तीन खूप सोपे शब्द वाटतात. या तीन शब्दांचा वापर आपण नेहमीच करत असतो. पण या शब्दांमध्ये जी ताकद आहे ती आपल्याला तेव्हा कळते जेव्हा आपण एखादा महत्त्वाचा निर्णय घेतो. मी शाळेमध्ये असताना खूप कमी बोलायचो. कॉलेजमध्येही तिच अवस्था होती. लोक माझ्या शांतपणावर हसायची. माझ्या शांतपणाचं कारण फक्त मलाच माहित होतं. मी बोलताना खूप भीतभीत बोलायचो. लोकं हसतील म्हणून मी बोलणच टाळायला लागलो. बाबांना जेव्हा याविषयी कळलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की लोक चांगल्या-वाईट प्रत्येक गोष्टीवर हसणारच. तेव्हा रडत बसू नकोस लढायला शिक. माझ्या आयुष्यातला हाच ठरलं तर मग क्षण होता जेव्हा मी यातून बाहेर पडायचं ठरवलं. डिप्लोमा इन थिएटर्स करताना मला माझ्या गुरुंचीही खूप चांगली साथ मिळाली. आज तुमच्या समोर उभा असणारा हा अमित भानुशाली कोणतीही भाषा अस्खलित बोलू शकतो. 


अर्जुन सुभेदार साकारण्यासाठी तू काय विशेष मेहनत घेत आहेस?


ठरलं तर मग मधला अर्जुन साकरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आव्हान माझ्यासाठी होतं ते म्हणजे वजन कमी करण्याचं. मी या भूमिकेसाठी जवळपास १७ किलो वजन कमी केलं आहे. भूमिकेची तशी गरज होती. अर्जुन वकील जरी असला तरी त्याला खेळाची आणि फिटनेसची आवड आहे. खऱ्या आयुष्यातही फिटनेसच्या बाबतीत मी खूपच जागृक असतो. शूटिंगचा कॉल टाईम कितीचाही असला तरी त्याआधीचे दोन तास मी जिमसाठी देतोच. शाळेत असल्यापासूनच फिटनेसचं वेड मला आहे. याचा उपयोग मला ही व्यक्तिरेखेसाठी सुद्धा झालाय. मालिकेत अर्जुनचे बरेचसे सीन प्रेक्षकांना पाहायला मिळतील ज्यात त्याचं फिटनेसविषयीचं प्रेम अधोरेखित होईल.






जुई गडकरी आणि तुझी केमिस्ट्री कशी आहे?


जुई आणि मी शूटिंगच्या पहिल्या दिवशी जेव्हा भेटलो तेव्हा फारसा संवाद झाला नाही. मी जुईला विचारलं तू अशीच शांत असतेस का? तेव्हा जुईने मला नव्या टीमसोबत मिसळायला थोडा वेळ लागतो असं सांगितलं. आता मात्र जुई आणि माझी छान मैत्री झाली आहे. सेटवर आम्ही सगळेच सहकलाकार खूप धमाल करतो. आमच्या निर्मात्या म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत मी एक हिंदी मालिकेत काम केलं होतं. सुचित्रा ताई सहकलाकार म्हणून उत्तम आहेतच पण निर्माती म्हणूनही त्यांच्यासोबत काम करताना धमाल येतेय. आमच्या सेटवर खूपच खेळीमेळीचं वातावरण असतं. शूट संपल्यानंतरही घरी जायची इच्छा होत नाही. सहकलाकारांसोबत छान मैत्री झाली आहे. मुळात आमच्या सेटवर प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळेच सीन करताना मजा येते. पडद्यामागचा हा घट्ट बंध प्रेक्षकांना मालिका बघतानाही जाणवेल. तेव्हा नक्की पाहा आमची नवी मालिका ठरलं तर मग 5 डिसेंबरपासून रात्री 8.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Entertainment News Live Updates 3 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!