चेन्नई : तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजयला (Thalapathy Vijay) मद्रास हायकोर्टानं (Madras high court) तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने सांगितले आहे की विजयने भरलेल्या दंडाची रक्काम तमिलनाडु मुख्यमंत्री कोव्हिड रिलीफ फंड मध्ये जमा करण्यात येणार आहे. हायकोर्टानं हा दंड विजयला त्याच्या लग्जरी इंपोर्टेड कार रॉल्स रॉयस घोस्टचा एंट्री टॅक्स न भरल्याबद्दल ठोठावला आहे. दंड सुनावताना कोर्टानं विजयला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार विजयला गाडीचा टॅक्स कर विभागाला 2 आठवड्याच्या आत भरावा लागणार आहे.
Happy Birthday Thalapathy Vijay : थलापती विजयच्या 'या' गोष्टी आपल्याला माहिती आहेत का?
मद्रास हायकोर्टाचे जस्टिस एसएम सुब्रमण्यम यांनी विजयला टॅक्स चोरी केल्याप्रकरणी हा दंड सुनावला आहे. सोबतच ऑर्डर देताना म्हटलं आहे की, जे फॅन्स अभिनेत्यांना खऱ्या आयुष्यात एका हिरोप्रमाणे पाहतात, असे अभिनेते तमिलनाडु सारख्या राज्याचे शासक बनले आहेत. चित्रपटात काम करणाऱ्या हिरोकडून टॅक्स चोरी करणार अशी अपेक्षा नाही. कारण, हा ॲटीट्यूड अँन्टी नॅशनल आणि असंवैधानिक आहे, असं कोर्टानं म्हटलं आहे.
Thalapathy Vijay | थलापती विजय सायकलवरून मतदानाला, ट्विटरवर पेट्रोल-डिझेल दरवाढ ट्रेन्डिंग
'हे अॅक्टर्स स्वत:ला समाजात सामाजिक न्याय स्थापित करणारे चॅम्पियन समजतात. यांच्या सिनेमात समाजात होणाऱ्या भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवण्यात येतो. पण यांनी आता टॅक्सचोरी केला आहे. कोर्टाला हे मान्य नाही, असं देखील मद्रास हायकोर्टानं म्हटलं आहे.
हायकोर्टानं ऑर्डर देताना म्हटलं आहे की, एकीकडे सामान्य लोकांना टॅक्स देण्यासाठी आणि न्यायपूर्ण जीवन जगण्यास जागरुक करण्यात येते. तर दुसरीकडे धनवान आणि प्रतिभावान लोकं टॅक्सचोरी करतात. अभिनेत्यानं त्यांच्या लाखो चाहत्यांच्या भावना समजायला हव्यात, जे लोक तिकिटं खरेदी करुन त्यांचे सिनेमा पाहतात, अशा शब्दात कोर्टानं विजयला झापलं आहे.