Actor Chandrakanth Dies :   पत्नीच्या अपघाती निधनाने धक्का बसलेल्या अभिनेत्याने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. एका कार अपघातात पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांमध्येच अभिनेत्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने मनोरंजनसृष्टी हादरली असून शोक व्यक्त केला जात आहे. तेलगू इंडस्ट्रीत टीव्ही मालिकेतील अभिनेता चंद्रकांत (Actor Chandrakanth Dies) याचे निधन झाले. अभिनेत्याने शुक्रवारी तेलंगणातील अलकापूर येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. चंद्रकांतची पत्नी पवित्रा जयराम हिचे एका कार अपघातात निधन झाले होते. त्याचा चंद्रकांत याला प्रचंड मानसिक धक्का बसला. 


अभिनेता चंद्रकांत हा पत्नी पवित्रा जयरामच्या निधनानंतर प्रचंड मानसिक तणावात होता, अशी माहिती समोर आली आहे.  त्याने आपल्या पत्नीसाठी एक भावूक पोस्टही लिहिली होती. त्यामध्ये त्याचे दु:ख दिसून आले. इन्स्टाग्रामवर त्याची शेवटची पोस्टही पवित्रासाठी होती.


आत्महत्येपूर्वी लिहिली भावूक पोस्ट... 


एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, 'तुझ्यासोबतचा शेवटचा फोटो (रडणारा इमोजी) मला एकटे सोडण्याचा विचार पचनी पडत नाही, माझी पावी (पवित्रा) आता नाही (रडत आणि प्रार्थना करणारा इमोजी) प्लीज, परत ये.'  चंद्रकांतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही, पापा (पवित्रा) परत ये ना...परत येत माझ्या डोळ्यातील अश्रू पुस...






कार अपघातात पवित्रा जयरामचे निधन


 






दोन कलाकारांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण तेलगू इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशातील मेहबूब नगरमध्ये कार अपघातात पवित्राचा मृत्यू झाला. कारवरील नियंत्रण गमावल्याने कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली होती. त्याच वेळी हैदराबाद येथून येणाऱ्या बसने कारच्या उजव्या बाजूला धडक मारली. या भीषण अपघातात अभिनेत्री पवित्राचे निधन झाले.