Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Kangana Ranaut Slap Case : कंगनाला विमानतळावर महिला जवानने कानशिलात लगावली, एक्स बॉयफ्रेंडने म्हटले, मी आता काय बोलणार...
Kangana Ranaut Slapp Case : भाजपकडून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेली अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या चर्चेत आहे. भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीसाठी जात असताना चंदिगड विमानतळावर सीएसएफआयच्या महिला जवानाने तिच्या कानशिलात लगावली. या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. बॉलिवूडमध्येही याचे पडसाद उमटू लागले आहेत. कंगनाच्या एक्स बॉयफ्रेंडने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Marathi Serial Updates : 'देवयानी' मालिकेतील आणखी एका कलाकाराचे प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एन्ट्री
Marathi Serial Updates : छोट्या पडद्यावर सध्या काही नवीन मालिका आल्या आहेत. तर काही नवीन मालिका सुरू होणार आहेत. टीआरपीसाठी ही स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे प्रेक्षकांना खिळवण्यासाठी सध्या प्रसारीत होणाऱ्या मालिकांमध्ये नवा ट्वीस्ट आणला जात आहे. सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीमध्ये आघाडीवर असलेल्या स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये ट्वीस्ट येत आहेत. आता स्टार प्रवाहवर लोकप्रिय ठरलेल्या 'देवयानी' या मालिकेतील आणखी एका कलाकाराचे स्टार प्रवाहवर कमबॅक होत आहे. 'देवयानी' आणि 'गोठ' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारा माधव देवचके (Madhav Deochake) आता 'अबोली' (Aboli Serial) मालिकेत झळकणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Santosh Juvekar : अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका
Santosh Juvekar : मराठी सिनेसृष्टीसह हिंदीतही आपली छाप सोडणारा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 'कलर्स मराठी' (Colors Marathi) वाहिनीवरील मालिकेतून संतोष जुवेकर मराठी मालिका विश्वात कमबॅक करत आहे. 'कलर्स मराठी' वाहिनीवरील सध्या लोकप्रिय असलेल्या 'इंद्रायणी' मालिकेतून संतोष छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 'कलर्स मराठी'ने नवा प्रोमो लाँच केला आहे.
सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा...
Manoj Jarange Patil : 'मराठ्यांनी आता फक्त लढायचं...', प्रसाद ओक, सुबोध भावे, कलाकारांची मांदियाळी; 'आम्ही जरांगे' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा महाराष्ट्रात गाजला आणि मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण राज्यात पसरलं. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उभारलेल्या लढ्याला महाराष्ट्राने पाठिंबा दिला. आता हाच लढा मोठ्या पडद्यावरही साकारला जाणार आहे. आम्ही जरांगे या सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतली मातब्बर मंडळी दिसणार आहे. प्रसाद ओक (Prasad Oak), अजय पुरकर (Ajay Purkar), सुबोध भावे (Subodh Bhave) ही स्टारकास्ट या सिनेमा दिसणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Panchayat Actor Struggle : कधी सैफ-करीनाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये होता वेटर,ओटीटीवर 'दामाद'जी म्हणून सोडलीय छाप
फार कमी जणांना सिनेइंडस्ट्रीत संधी मिळते आणि त्यातीलही काहींच्या पदरी यश मिळते. अनेक कलाकारांच्या स्ट्रगलच्या गोष्टीदेखील समोर येतात. 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये 'गज्जब बेज्जती है यार'! हा गाजलेला डायलॉग अनेकांच्या मनात स्थान मिळवून आहे. हा डायलॉग मीमर्सच्या आवडीचा डायलॉग होता. यावर अनेक मीम्स तयार झाले. फुलेरा गावचा जावई असलेला गणेश अर्थात आसिफ खान ( Asif Khan) याने पंचायतच्या पहिल्या सीझनमधील सर्वात राग आणणारी व्यक्तीरेखा ते सीझन 3 मध्ये लोकांच्या आवडीची व्यक्तीरेखा आसिफने साकारली आहे. त्याच्या स्ट्रगलच्या काळातील गोष्ट फार कमी लोकांना ठावूक असेल.