Kangana Ranaut Slapp Case :  भाजपकडून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेली अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या चर्चेत आहे.  भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीसाठी जात असताना  चंदिगड विमानतळावर सीएसएफआयच्या महिला जवानाने तिच्या कानशिलात लगावली. या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. बॉलिवूडमध्येही याचे पडसाद उमटू लागले आहेत. कंगनाच्या एक्स बॉयफ्रेंडने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 


 कंगना रणौतला विमानतळावर मारहाण झाल्यानंतर बॉलिवूडकरांनी या घटनेचा निषेध केला आहे. राजकीय मतमतांतरे असले तरी अशी कृती चुकीचे असल्याचे मत काही बॉलिवूड सेलेब्सने व्यक्त केले आहे. संगीतकार विशाल दादलानी याने  कंगनासोबत घडलेल्या प्रकाराचं समर्थन नाही केलं. पण त्या महिलेवर झालेल्या कारवाईचा मात्र निषेध केला. तर,  'हिरामंडी'मुळे पुन्हा चर्चेत आलेला अभिनेता शेखर सुमन याने देखील या प्रकरणावर भाष्य केले. 


शेखर सुमनने आणि अध्ययन सुमनने काय म्हटले?


शेखर सुमन आणि कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने या घटनेवर भाष्य केले आहे. शेखर सुमन यांनी म्हटले की, अशा प्रकारचे कृ्त्य कोणासोबतही घडले तरी चुकीचे आहे. कंगना आता मंडितून खासदार आहे. तिच्यासोबत जी घटना घडली ती वाईट घडली. विक्रमादित्यने सांगितल्या प्रमाणे तु्म्हाला विरोध दर्शवायचा असला तरी त्याची एक पद्धत आहे. योग्य पद्धत तुम्ही अवलंबली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे कृत्य करू नये असेही शेखर सुमन यांनी म्हटले. 


एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनने काय म्हटले?


अध्ययन सुमनला याबाबत विचारले असता, त्याने सांगितले की,  शेखर सुमन यांनी जे सांगितले ते अतिशय योग्य सांगितले. आता यावर मी काय बोलणार? सगळ्यांनी यावर भाष्य केले आहे. दुसरं म्हणजे तुमच्या मनात काही असेल तर ते वैयक्तिक पातळीवर घ्यावं, सार्वजनिकपणे नाही, असेही अध्ययने सांगितले.


कंगना रणौतचे प्रकरण काय आहे?


दिल्लीला जाण्यासाठी 6 जून रोजी कंगना रणौत मंडीहून चंदीगड विमानतळावर पोहोचली होती.  सुरक्षा तपासणीदरम्यान कंगना रणौतला सीआयएसएफची जवान  कुलविंदर कौरने तिच्या कानशिलात लगावली. कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याच्या निषेधार्थ कुलविंदरने कंगनाला मारले. कुलविंदरला सेवेतून निलंबित करण्यात आले असून तिची चौकशी होणार आहे. 


इतर संबंधित बातमी :