Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Marathi Serial Top Serial : टीआरपीच्या शर्यतीत 'झी मराठी'ची दमछाक, 'स्टार प्रवाह'चा दबदबा, अव्वल स्थानी कोणती मालिका?
Marathi Top 10 Serial TRP : छोट्या पडद्यावर टीआरपीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या वर्षातील 10 व्या आठवड्यातही स्टार प्रवाहचा दबदबा दिसून आला. टॉप 10 टेन मालिकांच्या यादीत स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका आहेत. तर, दुसरीकडे झी मराठीवरील वाहिन्यांवरील चार मालिकांचा टीआरपी वाढला आहे. मात्र, टॉप-15 मध्येही या मालिकांना स्थान मिळवता आले नाही.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ram Gopal Varma : दिग्दर्शक रामगोपाल वर्माची राजकारणात एन्ट्री; दाक्षिणात्य सुपरस्टारला निवडणुकीच्या रिंगणात देणार आव्हान
Ram Gopal Varma : बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा (Ram Gopal Varma ) यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेशमधील पिठापुरम (Pithapuram ) मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय रामगोपाल वर्मा यांनी जाहीर केला आहे. या मतदारसंघात त्यांचा सामना दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांच्याशी होणार आहे. पवन कल्याण यांचा जनसेना नावाचा पक्ष आहे. आता रामगोपाल वर्मा यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने रंगतदार लढत होईल असे म्हटले जात आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Aamir Khan : आमिर खानने चाहत्यांना दिले बर्थ डे गिफ्ट; 'अंदाज अपना अपना'च्या सिक्वेलवर मोठी अपडेट
Aamir Khan : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानने (Aamir Khan) गुरुवारी, 14 मार्च रोजी आपला 59 वा वाढदिवस साजरा करत 60 व्या वर्षात पदार्पण केले. आमिर खानने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमिर खानने आपल्या कारकिर्दीतील सुपरहिट आणि आयकॉनिक चित्रपट 'अंदाज अपना अपना'च्या (Andaz Apna Apna) सिक्वेलबाबत मोठी अपडेट दिली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Marathi Actress Tejashree Engagement : तेजश्रीच्या आयुष्यात प्रेमाची नवी गोष्ट; गुपचूप उरकला साखरपुडा
Marathi Actress Tejashree Engagement : सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरू आहे. मागील काही दिवसात मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांनी लग्नगाठ बांधत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. अभिनेत्री तेजश्री जाधव (Tejashree Jadhav) हिने प्रियकर रोहन सिंह (Rohan Singh) सोबत साखरपुडा केला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Soham Bandekar : बांदेकर भावोजी आणि सुचित्रा वहिनींना तुझ्या मालिकेत काम देणार का? लेकानं दिलं मिश्कील उत्तर, म्हणाला इच्छा आहे पण...
Soham Bandekar : सोहम बांदेकर (Soham Bandekar) हा स्टार प्रवाह वाहिनीवरील 'नवे लक्ष्य' या मालिकेतून घरोघरी पोहचला. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर (Adesh Bandekar) आणि सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांचा लेक सोहम हा 'सोहम प्रोडक्शन हाऊस' (Soham Production House) सांभाळत आहे. प्रेक्षकांना पसंतीस पडणाऱ्या आणि टीआरपीच्या शर्यातीत अव्वल असणाऱ्या मालिकांची निर्मिती ही सोहम प्रोडक्शनच्या बॅनरखाली झाली आहे. सोहमने ठरलं तर मग या मालिकेपासून मालिकेच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तसेच आता याच प्रोडक्शन बॅनरखाली घरोघरी मातीच्या चुली ही नवी मालिका सुरु होत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Siddharth Chandekar : ते आहेत पण कुठेत हेच माहित नाही, म्हणून मी... सिद्धार्थ चांदेकर वडिलांबद्दल झाला व्यक्त
Siddharth Chandekar : अभिनय क्षेत्रात काम करताना अनेक कलाकार त्यांच्या नावासोबत आईचं नाव जोडतात. त्यांची सिनेसृष्टीतली ओळखच आईच्या नावाने होते. नुकतच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) याने देखील त्याच्या आईचं नाव लावण्याचमागचं कारण सांगितलं आहे. सिद्धार्थ हा त्याच्या अभिनयामुळे आणि कामामुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच सिद्धार्थचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सिद्धार्थसोबत सई ताम्हणकर (Sai Tamhankar) देखील झळकली होती.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
प्रसिद्ध अभिनेत्रीला स्किन कॅन्सरचं निदान, पोस्ट शेअर करत दिली माहिती
Christie Brinkley Hollywood Actress : हॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल क्रिस्टी ली ब्रिंक्ले (Christie Brinkley) हिला नुकतच स्किन कॅन्सर (Skin Cancer) झाल्याचं निदान झालं होतं. ही बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. पण चांगली बाब म्हणजे क्रिस्टीला तिला कॅन्सर झाल्याचं लवकरच कळलं त्यामुळे तिच्यावर लवकर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती यशस्वीही झाली.