Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


 


Panchayat 4 Release Date : कसं असणार 'पंचायत-4' चे कथानक? ओटीटीवर कधी रिलीज होणार?


Panchayat 4 Release Date : ओटीटीवरील  लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक असलेली सीरिज पंचायतचा (Panchayat Season 3) तिसरा सीझन 28 मे रोजी लाँच झाला. यामध्ये फुलेरा गावातील आणखी एक अनोखी गोष्ट दिसून आली. पंचायत-3 सध्या ट्रेंड करत असून प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आता 'पंचायत-4' ची चर्चा सुरू झाली आहे. 'पंचायत-3' च्या शेवटासह 'पंचायत-4' ची सुरुवात होतेय. पण आता पंचायतचा चौथा सीझन कधी येणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 


 


Mirzapur Season 3 Updates: 'मिर्झापूर 3' मध्ये कोणाची सत्ता? रिलीज डेट बाबत समोर आली महत्त्वाची अपडेट



Mirzapur Season 3 Updates:  पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi), रसिका दुग्गल (Rasika Duggal) आणि अली फजल (Ali Fazal) यांची महत्त्वाची भूमिका असलेला आणि बहुप्रतिक्षीत 'मिर्झापूर' (Mirzapur) या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.  'मिर्झापूर 3'  (Mirzapur Season 3) कधी रिलीज होणार, यावरून सध्या चर्चा होत आहे. 'मिर्झापूर 3'ला घेऊन दररोज नवीन अपडेट्स येत आहेत. 'मिर्झापूर 3' मध्ये कोणाची हाती सत्ता असणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Manoj Jarange : कर्म मराठा, धर्म मराठा, मराठ्यांचा नवीन सरदार; 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


Manoj Jarange : 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाची टीम आज प्रमोशनसाठी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. 21 जून 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. जालना जिल्ह्यात मंठा या तालुक्यात चित्रपटाच्या टीमचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Pushpa 2 The Rule Song Angaaron Release : 'पुष्पा 2' मधील 'मेरा सामी'...गाणं रिलीज; श्रीवल्ली आणि पुष्पाच्या कपल साँगचा कल्ला


Pushpa 2 The Rule Song Angaaron Release : अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2' (Pushpa 2)  या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 'पु्ष्पा 2' ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी 'पुष्पा 2' मधील पहिले गाणे रिलीज झाले होते. आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झाले आहे. या गाण्यात श्रीवल्ली आणि पुष्पामध्ये रोमान्स दिसून येत असून नृत्याचे किलर मुव्हज दिसून येत आहे. या गाण्याचा सोशल मीडियावर कल्ला दिसून येत आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Omar Lulu Case :  दिग्दर्शकाने अतिप्रसंग केला, अभिनेत्रीचा आरोप; पोलिसात तक्रार दाखल, सिनेइंडस्ट्रीत खळबळ



Omar Lulu Case :  सिनेइंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दिग्दर्शकाने आपल्यावर बलात्कार केला असल्याची तक्रार एका अभिनेत्रीने पोलिसांत दाखल केली आहे. अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियरचा चित्रपट ओरू ओदार लवचा दिग्दर्शक ओमर लुलू याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणीने केरळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, दिग्दर्शक ओमरने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


Bollywood Actress : आलिया भट्ट ते तापसी पन्नू, मासिक पाळीचा 'या' अभिनेत्रींना होतोय त्रास; म्हणाल्या,"पीरियड्स लीव्ह..."



Bollywood Actress on Periods : मासिका पाळीदरम्यान (Menstrual Cycle) महिलांना अनेक असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. हार्मोनल बदलांमुळे पाठ, पोट आणि कंबरेत वेदना होतात. मासिक पाळीच्या (Periods) त्या चार दिवसांत स्त्रियांना विविध समस्या छळतात. या दिवसांत शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाणं त्रासदायक ठरतं. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना खास सुट्टी द्यावी यासाठी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. सर्वसामान्य महिलांप्रमाणे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनाही (Bollywood Actress) या दिवसांमध्ये त्रास होतोय. काही अभिनेत्रींचं मत आहे की मासिक पाळीदरम्यान त्यांना सुट्टी मिळावी. तर काही अभिनेत्री मात्र यासाठी असहमत आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...


 


OTT : पाकिस्तानी प्रेक्षकांना आजही बॉलिवूडची भूरळ! 'या' वेबसीरिज आणि चित्रपटांनी लावलंय वेड


OTT Web Series : भारतात प्रत्येक जॉनरचे चित्रपट (Movies) आणि वेबसीरिजची (Web Series) निर्मिती होते. प्रत्येक विषयावर कलाकृती बनवायला भारतातील लेखक, दिग्दर्शकांना आवडतं. यामुळे भारतीय चित्रपट आणि वेबसीरिज फक्त देशातच नव्हे तर परदेशातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. नेटफ्लिक्सवर सध्या भारतीय चित्रपट आणि वेबसीरिज प्रचंड ट्रेडिंगमध्ये आहेत. या चित्रपटांना आणि वेबसीरिजला जगभरातील प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पाकिस्तानमध्येही या सीरिज आणि चित्रपट आवडीने पाहिल्या जात आहेत. जाणून ध्या नेटफ्लिक्सवरील 'टॉप 10' चित्रपट आणि वेबसीरिजबद्दल...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...