‘झी मराठी’ वाहिनीवर ‘लक्ष्मी निवास’ ही मल्टीस्टारर कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे! 'लक्ष्मी निवास' मालिका आरंभापासूनच काही न काही कारणांनी ती प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. आता कारण आहे ते म्हणजे जयंत आणि जान्हवीच फुलणारं नातं.या जोडीला प्रेक्षकांचं पुरेपूर प्रेम मिळत आहे. मालिकेत जान्हवी-जयंतचा हल्लीच साखरपुडा झाला आणि लगेच जान्हवीचा वाढदिवस आला आहे. जान्हवीची अपेक्षा आहे आपल्या घरी वाढदिवस एकदम छान साजरा केला पाहिजे. हे जयंतला कळलंय आणि तो तिचा वाढदिवस खास बनवण्यासाठी  पूर्ण तयारी करतोय. जयंत जान्हवीला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे. वाढदिवसाला जयंत तिला अनेक सरप्राईज देणार आहे.  


तिच्यासाठी वाढदिवसाला क्रूज आणि जेटप्लेन मध्ये तिला फिरायला नेतो. हे सर्व सीन्स शूट करण्यामागचे गंमतशीर किस्से तुम्हीही जाणून घ्यायला उत्सुक असल्यानं जयंतची भूमिका साकारत असेलला मेघन जाधव ने काही किस्से सांगितले आहेत 

"जान्हवीच्या बर्थडे सीनचा किस्सा खूप गंमतशीर आहे. पाहिलेतर एक कलाकार म्हणून माझ्यासाठी हा उत्तम अनुभव होता. मी २० वर्षापासून इंडस्ट्री मध्ये काम करत आहे आणि जेव्हा मला कळले की आमच्या मालिकेत क्रूज आणि जेटप्लेनमध्ये शूट करणार आहोत ते ही एका दिवसात तेव्हा मी प्रोडकशनच्या दृष्टिकोनातून विचार करत होतो हे सर्व कसं साध्य केलं जाईल कारण बिलकुल सोपं नव्हतं इतक्या कमी वेळेत सर्व पार पडणं, पण आम्ही ते गाठलं. मला अचानक रात्री कॉल आला की उद्या गोव्याला जायचे आहे, आऊटडोअर मध्ये काही दिवस आधी ठरत आणि कळवल जात पण आमचं अचानक ठरलं. मी लहानपाणी गोव्याला गेलो होतो आणि त्यानंतर आता जात होतो तर त्याची उत्सुकता ही होती. याहुन जास्त जबरदस्त मनात भावना ही होती कि आपण फक्त एका दिवसासाठी, एक सीन शूट करायला जात आहोत. मी शूटिंगचे बरेच अनुभव घेतले आहेत. माझ्यासाठी प्रोडकशन टीम कशी सर्व व्यवस्था करते आणि कुठे- कुठे जाऊन लोकेशन शोधून सर्व प्लॅन करते  याचा विचार मी करत होतो. आणि मला अभिमान वाटतो की  'लक्ष्मी निवास' महामालिकेमुळे आपण मराठी टेलिव्हिजनवर असे सीन्स आणत आहोत जे आता पर्यंत प्रेक्षकांनी चित्रपटात पाहिले असतील. 


एक किस्सा तुम्हाला सांगायला आवडेल, मुंबई वरून गोव्याला मी आणि दिव्या एकटे जात होतो आणि मला जान्हवी म्हणजेच दिव्या पुगावकरला पहाटे २:३० वाजता पिकअप करून एअरपोर्टला जायच होते. दिव्या आणि मी ठरवले कि २:३०ला निघायचे कारण पहाटे ४ च फ्लाईट होत. मी २ वाजता दिव्याला कॉल केला पण ती काही कॉल उचलतच नव्हती. मी थोडा टेन्शन मध्ये आलो, आता इतक्या रात्री कोणाला कॉल करायचा . पण थोड्यावेळाने तिचाच कॉल आला. गोव्याला पहाटे पोहचलो आणि हॉटेलवर जाऊन फ्रेश होऊन आम्ही क्रूजवर पोहचलो  कारण एका दिवसात सर्व कामं पूर्ण करायची होती. त्या दिवशी आम्ही सर्व कामात इतके गुंतलो होतो कि आम्ही आमचं  जेवणही विसरलो. कारण डे लाईटचा ही प्रश्न होता. 
संध्याकाळी बीचवर शूट केल पण गोवा अनुभवता आलं नाही. सगळी मेहनत तेव्हाच सफल होते जेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम मिळतो आणि मला जयंतच्या भूमिकेसाठी पहिल्या दिवसापासून खूप छान प्रतिसाद मिळत आहे सर्वाना जयंत आणि जान्हवीची जोडी प्रचंड आवडत आहे, आम्हाला सोशल मीडियावर मेसेजेस ही येतात. आमच्या 'लक्ष्मी  निवास' मालिकेसाठी बस तुमची साथ अशीच लाभूदे."