'भाबीजी'ची लवकरच घर वापसी
एबीपी माझा वेब टीम | 16 Jul 2016 08:31 AM (IST)
मुंबई: तुम्ही सर्वजणच 'भाबीजी घर पर है' या सीरियलमधील भाबीजी म्हणजे शिल्पा शिंदेला नक्कीच मिस करत असाल. पण शिल्पाशी संबंधित एक चांगली बातमी आली आहे. अभिनेत्री शिल्पा शिंदेची प्रसिद्ध व्यक्तिरेखा 'भाबीजी'मध्ये पुन्हा कमबॅक करणार आहे. निर्मात्यासोबत वाद झाल्याने तिने 'भाबीजी घर पर है'सीरियल अर्ध्यावरच सोडल्याचे बोलले जात होते. पण टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, शिल्पा शिंदे पुन्हा एकदा एका नव्या शोच्या माध्यमातून कमबॅक करणार आहे. 'कॉन्ट्रोव्हर्शियल भाबीजी' हे तिच्या नव्या शोचे नाव असेल.