Bigg Boss Marathi Season 5 Day 46 : 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा (Bigg Boss Marathi Season 5) आता सातवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात छोटा पुढारी घन:श्याम दरवडे घराबाहेर गेला. तर, संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. घरात नॉमिनेशन टास्क पूर्ण झाल्यानंतर वादावादी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावंकर यांच्यात जोरदार वादावादी झाली.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये निक्की आणि वर्षाताईंमध्ये भाजीवरुन भांड्याला भांड लागलेलं पाहायला मिळत आहे. निक्की वर्षा उसगावंकरांना म्हणाली की,"इथे लोकांना या घरात लोकांना अन्न मिळत नाही आणि यांनी सरळ भाजी फेकली आहे". त्यावर उत्तर देत वर्षाताई म्हणतात,"कारण मला ती खराब वाटली". पुढे दोघांची तू-तू, मैं-मैं सुरू असते.
दरम्यान, 'बिग ब़ॉस मराठी'च्या घरात संग्राम चौगुलेची एन्ट्री झाल्यानंतर आता घरातील समीकरणे ही बदलताना दिसत आहे. संग्रामने पहिल्याच दिवशी अरबाजला ठस्सन दाखवली. तर, निक्कीसोबत पंगा घेतला. त्यामुळे निक्की-अरबाज यांनी संग्रामविरोधात आघाडी उघडली आहे. तर, दुसरीकडे इतर सदस्य संग्रामसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
हे' सदस्य झालेत नॉमिनेट
या आठवड्यातही एका सदस्याचा घरातील प्रवास संपणार आहे. त्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन कार्य पार पडलं. या आठवड्यात सूरज घराचा कॅप्टन असल्याने तो सेफ आहे.
'बिग बॉस मराठी'चा सध्या सातवा आठवडा सुरू आहे. सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क नुकताच पार पडला आहे. सातव्या आठवड्यात अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि आर्या जाधव हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात कोणता सदस्य घराबाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.