चंदीगड: नवज्योत सिंग सिद्धू यांनी टीव्ही शोमध्ये काम केलं तर त्यांच्याकडे असलेल्या खात्यात बदल होऊ शकतो, असे संकेत मुख्यमंत्री अमरिंदर सिंह बादल यांनी दिले आहेत.

सिद्धू कपिल शर्माच्या शोमध्ये दिसतात. सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये ते सेलिब्रिटी गेस्ट म्हणून झळकतात.

टीव्ही शोमध्ये काम करण्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार माजी क्रिकेटर आणि पंजाब सरकारमधले मंत्री वज्योतसिंग सिद्धू यांनी केला.

मी 70 टक्के टी.व्ही. शो मध्ये काम करणं सोडलंय. आता फक्त एका शो साठी काही तास संध्याकाळ ते सकाळपर्यंत दिले. तर कोणीही हरकत घेण्याची गरज नाही, असंही सिद्धूनं म्हटलंय.

अकाली दलाच्या सुखबीर बादल यांच्याप्रमाणे मी ट्रान्सपोर्टर होऊ शकत नाही. माझ्या कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी  टी.व्ही शो मध्ये काम केलं तर लोकांच्या पोटात का दुखतंय, असा सवालही सिद्धूनं उपस्थित केला.

कायदेशीर सल्ला घेऊ- अमरिंदर सिंह

मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर नवज्योतसिंह सिद्धू यांनी टीव्हीवर काम करण्याचा इरादा बोलून दाखवला होता. तसंच रात्री शूटिंग करुन दिवसा मंत्रिपदाचं काम करेन, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

परंतु सिद्धू यांनी टीव्हीवर काम करणं सुरु ठेवावं की नाही यावर अॅटर्नी जनरल यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेईन. संविधानात याबाबत काय तरतूद आहे, हे मला माहित नाही. मंत्री असताना त्यांना हे काम करता येईल का याबाबत वकिलांना विचारणार आहे. हे संपूर्णत: कायद्यावर अवलंबून आहे, असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर स्थानिक प्रशासन, पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग, संग्रह आणि संग्रहालय यांसारख्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे.

संबंधित बातम्या
टीव्ही शोमध्ये काम करण्याच्या सिद्धू यांच्या इराद्याला सुरुंग?

सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट

 ...म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं



...म्हणून सचिन तेंडुलकर कपिल शर्माच्या शोमध्ये जात नाही!