Vishakha Subhedar: अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. विशाखानं अनेक नाटक, मालिका आणि कार्यरक्रमांमध्ये काम केलं आहे. विशाखा ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत होती. त्यानंतर तिनं हा शो सोडला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विशाखा सुभेदारनं महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. 


 मज्जा या युट्यूब चॅनलला विशाखा सुभेदारनं नुकतीच मुलाखत दिली. हास्यजत्रा हा कार्यक्रम का सोडला? असाही प्रश्न विचारण्यात आला. या मुलाखतीमध्ये विशाखा सुभेदार  सांगितलं, 'मी 13 वर्ष स्किट फॉरमॅट करते. मला वेगळं काहीतरी करायचं होतं. स्किट झाल्यानंतर जजमेंट केले जात होते. यासगळ्याचा मला कंटाळा आला होता. आपल्या कामाचं आपल्याला समाधान मिळायला पाहिजे. '


पुढे ती म्हणाली, 'माझा आपमान केला असं काहीच झालं नाही. हास्यजत्रेमध्ये माझे लाड देखील झाले आणि तिथं मला फटकारलं देखील गेलं. मला टोपणे देखील खावे लागले. जे प्रत्येक कलाकाराला ऐकावे लागतात. जर कलाकाराचं काम चुकलं तर त्याला बोलणी खावी लागतात. जर काम चांगल झालं तर कौतुक देखील करतात. आजही लोक भेटले की, लोक म्हणतात की, तुम्ही हास्यजत्रा का सोडली?


मुलाखतीमध्ये विशाखा सुभेदारनं तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत देखील सांगितलं. ती म्हणाली, 'काम शोधत असताना पैसे खर्च व्हायचे. मी आकाशवाणीमध्ये काम करायचे, मी शाळेत शिकवायचे. उल्हासनगरमधून मी ड्रेस घ्यायचे आणि  विकायचे. ट्रेनमध्ये माझ्या खूप मैत्रिणी झाल्या. ' 


मुलांच्या नावाबाबत विशाखा सुभेदारनं  सांगितलं, 'मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा मी ठरवलं होतं की, मला मुलगा झाला तर मी अभिनय ठेवणार आणि मुलगी झाली यामिनी ठेवणार'


फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन या कॉमेडी शोमध्ये विशाखानं काम केलं. तसेच विशाखा ही 'शुभविवाह' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत ती रागिणी आत्या ही भूमिका साकारत आहे. मस्त चाललंय आमचं, ये रे ये रे पैसा-2, येड्यांची जत्रा या चित्रपटांमध्ये देखील विशाखानं काम केलं आहे. विशाखा ही गेल्या काही दिवसांपासून कुर्रर्रर्रर्र या नाटकामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.विशाखाच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


संबंधित बातम्या:


Vishakha Subhedar : "हो..आहे वजनदार, पण..."; वजनावरुन डिवचणाऱ्यांना विशाखा सुभेदारचं सडेतोड उत्तर