Vishakha Subhedar Post On People Trolling On Weight  : विनोदवीर विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशाखाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. दरम्यान वजनावरुन डिवचणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणारी विशाखाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


विशाखा सुभेदारची पोस्ट काय? (Vishakha Subhedar Post)


विशाखा सुभेदारने 'मला प्रितीच्या झुल्यात झुलवा' या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने एक जबरदस्त कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे,"मी लाडाची...आता धरती मातेचं काय होईल? भूकंप होईल या सगळ्या कमेंट ठेवा तुमच्यापाशी...हो आहे वजनदार..पण मला पण एन्जॉय करू द्या की तुमचं रंजन करत आलेच आहे की मी... मज्जेत राहू द्या आणि तुम्ही पण मज्जेत राहा". 


विशाखा सुभेदारच्या या पोस्टवर एक नंबर, किती गोड, खूपच भारी, अफलातून एकदम भन्नाच नाचलीस..लय भारी, ताई तू खरचं गोड आहेस, वजनदार अभिनय, अप्रतिम नृत्य सादरीकरण, तुम्ही छान आहात..फक्त हास्यजत्रा सोडलीत याचा थोडासा राग आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. विशाखा सुभेदारची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 






विशाखा सुभेदारने अनेक विनोदी कार्यक्रमांत आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. 'फक्त लढ म्हणा','4 इडियट्स','अरे आवाज कोणाचा','ये रे ये रे पैसा' आणि '66 सदाशिव' अशा अनेक सिनेमांत विशाखा सुभेदारने काम केलं आहे. सध्या कुर्रर्रर्रर्र या नाटकामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


विशाखाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. विशाखानं शेअर केलेल्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इन्स्टाग्रामवर (Instagram) जवळपास 90 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. विशाखा सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करत असते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात अभिनेत्री पुन्हा दिसावी अशा चाहत्यांची इच्छा आहे.


संबंधित बातम्या


Mahesh Manjrekar : जियो स्टुडिओ निर्मित 'एका काळेचे मणी' वेब सीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस; प्रशांत दामले, ऋता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत