Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. मधुराणी या अनेक वेळा मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. नुकताच मधुराणी यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
मधुराणी प्रभुलकर यांची पोस्ट
मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या गाडीमध्ये शूट करताना दिसत आहे. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'रोज नवीन काहीतरी शिकत असतो आपण...! गाडी चालवायला आवडतेच मला. पण तशी उशीरा शिकले चालवायला . अलिकडेच म्हणायला हवं. गाडी येणं ह्याचे अनेक फायदे वेळोवेळी अनुभवले. पण अशी कधी गाडी चालवू असा विचारही केला नव्हता.
'रिग , कॅमेरा , आणि घाटातला प्रवास। त्यात घाटात गाडी सांभाळायची, संवाद म्हणायचे, इमोशन्स सांभाळायच्या , रस्त्यावरचं लक्ष ढळू द्यायचं नाही. ही तारेवरची कसरत होती.सुरुवातीला जरा भीती वाटली पण नंतर मजा यायला लागली. भीती ची भावना पार केली तरच अनुभव गाठीशी गोळा होतात. नाहीतर आपण तिथेच राहतो , नाही का !' असंही त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं.
पाहा व्हिडीओ:
'आई कुठे काय करते' या मालिकेत मधुराणी प्रभूलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात. अरुंधती ही तिची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. तर 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. या मालिकेतील ईशा ही भूमिका अपूर्वा गोरे ही साकारते. 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनेक ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात.
निरंजन कुलकर्णी, अभिषेक देशमुख, अश्विनी महांगडे हे कालाकार देखील या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारतात. आई कुठे काय करते या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या कथानकात वेगवेगळे वळण येत असतात.
संबंधित बातम्या:
Tejashree Pradhan : सायली-अरुंधती पडली मागे; टीआरपीच्या शर्यतीत तेजश्री प्रधानने मारली बाजी