Vishakha Subhedar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशाखा सुभेदार सध्या धुमाकूळ घालत आहे. विशाखाचे चाहते देखील तिचं नेहमीच भरभरून कौतुक करत असतात.  महाराष्ट्रातील घराघरात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम न चुकता पाहिला जातो. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव यासारखे अनेक विनोदवीर प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहेत. अशातच विशाखा सुभेदारने इस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 


समीरला गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी एक खास भेटवस्तू दिली होती. या भेटवस्तूचे फोटो समीरने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर विशाखा सुभेदारनेदेखील भावनिक पोस्ट लिहिली आहे. विशाखाने लिहिले आहे, काय बोलू... शब्द हरवले आणि डोळे वाहू लागले...घरी एक पार्सल आलं..त्यात चमचमत्या कागदात गुंडाळलेलं एक कार्ड होतं. त्यावरच नाव वाचलं. आणि दोन सेकंद धस्स झालं काळजात.. लता मंगेशकर…! त्या कायम हास्यजत्रा पाहतात आणि त्यांना आमचं काम आवडत म्हणून त्यांनी आशीर्वाद रुपी भेट पाठवली. त्यांनी केलेले हे कामाचं कौतुक आणि आवर्जून पाठवलेली भेट."






विशाखाने पुढे लिहिले आहे, मी ठार झालेय खरंतर… देवा अजून काय हवयं…! यासाठी मी कायम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची आभारी असेन आणि ज्यांनी आम्हाला घडवलं ते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे आणि सोनी मराठीचे देखील आभार. अमित फालके, अजय भालवणकर, आणि आमची संपूर्ण जत्रेची टीम आणि या यशात  समीर चौगुले तुझ्याशिवाय काहीही शक्य नव्हतं.. धन्यवाद.". 


लता मंगेशकर यांनी समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांच्यासाठी खास भेटवस्तू पाठवली आहे. तसेच या भेटवस्तूंवर लता मंगेशकर यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात शुभेच्छा संदेशही लिहिला आहे. 


संबंधित बातम्या


'आयुष्यातील सुवर्ण क्षण...'; लता मंगेशकरांकडून समीर चौघुलेला खास भेट


Bipin Rawat : सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर कलाकारांनी व्यक्त केला शोक


Devmanus 2 : पुनश्च हरिओम! 19 डिसेंबरला 'देवमाणूस 2' मालिकेचा महाआरंभ, एक तासाचा विशेष भाग


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha