मुंबई : ‘गुलाबी गोंधळ’ या नाटकाचं पोस्टर सध्या चांगलंच चर्चेत आहे. कारण या नाटकाच्या पोस्टरवर चक्क प्रिया वारियरचा फोटो छापला आहे. हो तीच प्रिया जीने गेल्या दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

आता त्या प्रियाचा फोटो मराठी नाटकाच्या पोस्टरवर बघून तुमचा ‘गुलाबी गोंधळ’ उडू शकतो. कदाचित ‘ती’ प्रिया मराठी नाटक करतेय का असा प्रश्नही पडू शकतो. पण थोडं थांबा. कारण ‘त्या’ प्रियाचा आणि  या नाटकाचा तसा काहीच संबंध नाही. मग तुम्ही विचाराल मग हा फोटोचा सावळा गोंधळ कशासाठी? तर याचं उत्तर आहे अर्थातच पब्लिसिटीसाठी.

मराठी नाटक बघायला प्रेक्षक येत नाहीच, मग त्यांनी किमान जाहिरात तरी बघावी म्हणून हा फोटो प्रपंच असं म्हणत आहेत. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक जनार्दन लवंगारे. प्रिया वारियर सध्या भलतीच चर्चेत आहे. त्या चर्चेचा या नाटकाला थोडा फार फायदा झाला तरी पूरे या सरळ सरळ हिशोबाने प्रियाला पोस्टरवर स्थान देण्यात आलं आहे.

नाटकाचं पोस्टर :



थोडक्यात काय तर पब्लिसिटीसाठी वाट्टेल ते. मात्र याने या नाटकाला कितपत फायदा होतो ते लवकरच कळेल.