महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकरांच्या कारला अपघात
एबीपी माझा वेब टीम | 21 Feb 2018 05:17 PM (IST)
सीटबेल्ट लावल्यामुळे आदेश बांदेकरांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत.
मुंबई : महाराष्ट्राचे लाडके 'भावोजी' अशी ख्याती असलेले अभिनेते, होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्या कारला अपघात झाला. सुदैवाने आदेश बांदेकर सुखरुप आहेत. साताऱ्यात कराड रोडवर आदेश बांदेकरांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती आहे. सिद्धिविनायक मंदिराचे चेअरमन असलेले आदेश बांदेकर मंदिराच्या वतीने एक कोटींचा निधी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी जात होते. टायर फुटल्यामुळे दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या. आदेश बांदेकर फॉर्च्युनर गाडीने प्रवास करत होते. सीटबेल्ट लावल्यामुळे आदेश बांदेकरांना कोणतीही दुखापत झाली नसून ते सुखरुप आहेत. आदेश बांदेकर यांच्यासोबत सिद्धिविनायक मंदिराचे इतर विश्वस्तही होते. मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नसल्याची माहिती आहे.