Vicky Jain Is Not happy With Wife Ankita Lokhande: टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे (Television Actress Ankita Lokhande) सध्या लाफ्टर शेफ शोमध्ये तिचा पति विक्की जैनसोबत (Vicky Jain) दिसून येते. सध्या सुरू असलेल्या सेलिब्रिटी मास्टर शेफपेक्षाही (Celebrity Masterchef) लाफ्टर शेफ (Laughter Chef) शोला अनेकांची पसंती मिळत आहे. अशातच अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पति विक्की जैन यांच्यासोबतच अंकिताच्या सासुबाई देखील कधीकधी या शोमध्ये दिसून येते. या शोचे अनेक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी अंकिताच्या सासुबाई थेट लाईव्ह शोमध्ये नातवंडांचं तोंड पाहण्याची इच्छा व्यक्त करतात, तर कधी विक्की जैन स्वतः आपल्या पत्नीला गमतीनं पीडतानाचा व्हिडीओ समोर येतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पण हा व्हिडीओ पाहून आता अंकिता आणि विक्की यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अंकिता, विक्कीच्या नात्यात दुरावा?
अलिकडेच अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विक्की जैन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारती सिंह अंकिताला विचारते की, प्रेम म्हणजे काय? यावर अंकिता म्हणते की, प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे. कधीकधी भांडणं होतात... पण अंकिता बोलत असतानाच कृष्णा अभिषेक येतो आणि मध्येच येऊन थांबतो आणि म्हणतो, "नाही, तू एक गोष्ट चुकीची बोललीस, भांडणही नाही... फक्त भांडणंच होतात...."
विक्की जैनचं कोड्यात टाकणारं वक्तव्य...
कृष्णा अभिषेकचं बोलणं ऐकल्यानंतर विक्की जैन स्वतःला बोलण्यापासून आवरू शकत नाही. तो जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो की, कधीकधी मला असं वाटतं की, प्रेम कधी झालंच नाही... तर ते थोपवलं गेलं..." विक्कीचं हे बोलणं ऐकून क्षणार्धात शोमधलं वातावरण बदलून जातं. अंकिता संतापते.
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून युजर्सकडून कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. एका युजरनं कमेंट करत लिहिलं आहे की, "अरे वा... अखेर विक्कीनं खरं सांगूनच टाकलं...", तर दुसऱ्या एक युजरनं म्हटलं की, "विक्की अंकितासोबत खूश नाही...", तर एका युजरनं लिहिलं की, "शोमध्ये अंकिताचा अपमान वारंवार होतच असतो..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :