Vanita Kharat :  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री वनिता खरात  (Vanita Kharat)  ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवते. लवकरच वनिता ही  'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील वनिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


 येत्या 24 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित  'एकदा येऊन तर बघा' या  चित्रपटात वनिता दाक्षिणात्य अंदाजात दिसणार आहे. "वेगळी भूमिका करण्याची संधी प्रत्येक कलाकार शोधत असतो. 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने ही संधी मला मिळाली असून माझं हे पात्र प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील", असा विश्वास वनितानं व्यक्त करते. या चित्रपटात तिच्यासोबत गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर,  पॅडी कांबळे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर,  शशिकांत केरकर,  सुशील इनामदार, रोहित माने आदि  तगड्या कलाकारांच्या भूमिका आहेत. लेखक-अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करत आहे.


वनितानं तिच्या ‘एकदा येऊन तर बघा'  या चित्रपटामधील लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'एकदा येऊन तर बघा' माझा South Indian अवतार ! प्रेमळ माणसांनी प्रेमाने केलेली कलाकृती! 24 नोव्हेंबरपासून फक्त सिनेमागृहात'






‘एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.  चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत. गीते मंदार चोळकर यांची असून रोहन-रोहन, कश्यप सोमपुरा यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. छायांकन योगेश कोळी तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. कार्यकारी निर्माते मनोज अवाना तर लाईन प्रोड्युसर मंगेश जगताप आहेत.  


वाचा सविस्तर बातम्या: 


Prasad Khandekar: ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकर करणार दिग्दर्शन