Tharla Tar Mag: अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari)  ठरलं तर मग (Tharala Tar Mag) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. ठरलं तर मग मालिकेनं 7.4 टीआरपीचा टप्पा गाठला आहे. अशातच या मालिकेनं टीआरपी लिस्टमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांक पटकावला आहे. नुकताच जुईनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ठरलं तर मालिकेची संपूर्ण टीम सेलिब्रेशन करताना दिसत आहे. 


जुईनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ठरलं तर मग मालिकेची सर्व टीम केक कट करताना आणि डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला जुईनं कॅप्शन दिलं, "एकत्र सेलिब्रेशन केल्यानंतर टीम एकत्र राहते! आज आमच्या मालिकेला 7.4 टीआरपी मिळाला आहे!  हो, हा आकडा गाठण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे ! देना वाला जब भी देता, देता छपर फाडके! टीमचे अभिनंदन"


पाहा व्हिडीओ:






जुईनं तिच्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीवर एक फोटो देखील रिपोस्ट केला होता. या फोटोमध्ये टीआरपी लिस्ट दिसत आहे. या लिस्टमध्ये ठरलं तर मग ही मालिका पहिल्या क्रमांकावर दिसत आहे तर तुझेच मी गीत गात आहे ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर दिसत आहे.


जुई ही ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.  ठरलं तर मग या मालिकेमध्ये जुईसोबतच अमित भानुशाली,चैतन्य सरदेशपांडे , ज्योती चांदेकर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारतात. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. जुईनं या मालिकेमध्ये सायली अर्जुन सुभेदार ही भूमिका  साकारली आहे. तर अमित भानुशालीनं या मालिकेत अर्जुन प्रताप सुभेदार ही भूमिका साकारली आहे. ठरलं तर मग या मालिकेतील सायली आणि अर्जुन यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेनं काही दिवसांपूर्वी 200 भागांचा टप्पा पूर्ण केला. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Jui Gadkari: ठरलं तर मग फेम जुई गडकरीनं शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, "पुढचं पाऊल आणि..."