बिग बॉसचा पाहुणचार कसा वाटला?
तो पाहुणचार नव्हता. मी तिथे स्वयंपाकीण होते. मजा आली. सगळं सहन करत, एक वेगळं जीवन जगून आले.
तुमच्या प्रवासाचं मोजमाप कसं कराल?
आपल्याही घरात भांडणं होतात. बिग बॉसचं घरही मी आपलं मानलं. तिथे मी मोजक्याच लोकांना ओळखत होते.
नंदकिशोर आल्यावर त्याला खूप चरबी होती. वाईल्ड कार्ड एण्ट्रीनंतर त्याने दिखावेगिरी केली. त्याला फळ मिळालं, त्याच्या डोक्यावर अंडी फुटली, पीठ टाकलं, मला आनंद झाला.
एखादा माणूस एव्हढं बोलतोय, तुम्हाला बोलावंस वाटलं नाही?
सुरुवातीला मी त्याला समजावलं. त्याला सांगितलं, तू इतका बोलतोयस, तू असं नको समजू मी गांX आहे. मी गांX नाहीय. मी तो शब्द वापरला. इतकं बरं नाही. तुझी माझी दोस्ती नाही, तुझी माझी वयाची बरोबरी नाही. मग भूषणही तसंच करायला लागला. त्यावेळी मी भूषणला म्हटलं तुझ्या आईला तू असंच चिडवत होतास? तरी तो माझी पाठ सोडतच नव्हता.
संध्याकाळी नंदकिशोर बिस्किट मागत होता तेव्हा मी तोंड न बघता त्याला बिस्किट दिलं. नंदकिशोरचं वागणं दुसऱ्या दिवशीही सुरुच होतं. मी भूषणला सांगितलं त्याला थांबव. पण शेवटी एखाद्याने ठरवलेलंच असलं, आपण त्याला छळायचं, तर आपण त्याला न थकता काय करतोय ते बघायचं.
नंदकिशोर म्हणाला, तू म्हातारी आहेस म्हणून नायतर...... तेव्हा पुष्कर म्हणाला नायतर काय?
मी पुष्करला थांबवलं. हा वाईल्ड कार्ड एण्ट्रीवाला माणूस मारामारी करु शकेल, म्हणून मी पुष्करला बाजूला सारलं. बाकी ठिकाणच्या बिग बॉस मध्ये होतं, तसं मराठीत होऊ नये असं मला मनापासून वाटत होतं.
मला शिव्या देता येत नव्हत्या? पण मला दाखवायचं नव्हतं. मी सहनशील झाले होते.
मला ज्यांनी ज्यांनी छळलं, त्यांना त्यांना देवाने शिक्षा दिली. देवाचं माझ्याकडे लक्ष आहे. मी देवाला कधीही फाXXवर मारलं नाही.
आणखी एक माणूस पहिल्या दिवसापासून तुमच्या मागे होता..त्या माणसाबद्दल काय वाटतं?
अनिल थत्ते नादान, चक्रम, येडछाप माणूस होता. तो येडXX माणूस होता. मी त्याला ओळखत नव्हते, हा कोण माणूस मला माहित नव्हतं. केस रंगवून, टिकल्या लावून कोण आलंय असा मी विचार करत होते. मी कुणालाही मुलाखत दिली नव्हती की मी वयाने मोठी आहे.
मला दोन पेपरमधून फोन आला होता तेव्हा मी जातेय असं सांगितलं होतं. पण हा माणूस मी मोठी आहे असं म्हणाल्याचं का म्हणतोय?
त्याने आल्यापासून मला पिडलं. पण मी रिअॅक्ट झाले नाही.
तुमचा हाच आवेश बिग बॉसच्या घरात का दिसला नाही?
बाहेर आल्याने मी आझाद पंछी आहे. मला खुशी आहे. आतमध्ये बसून बसून मी त्याच्यावरच विचार करत होते. मला माहित नसताना या लोकांनी मला नॉमिनेट केल्याचा मला त्रास झाला. माझं बीपी हाय झालं. म्हणून मी आतून त्रास करुन घेणं टाळलं.
कोण जिंकेल? कोण जिंकायला हवं?
कोण जिंकेल हे काय सांगता येत नाही. कोणीही जिंकू शकेल.
तुमचा लाडका स्पर्धक कोण?
मला पुष्करबद्दल वाटत होतं, मेघाही आवडती आहे.
रेशम आणि मेघामध्ये टशन आहे. घरात काय चित्र असतं?
घरात भांडणं हमरीतुमरी झालेली नाही.
एकत्र राहून तीच तीच तोंडं रोज बघून मी बधीर झाले होते. कंटाळले होते. बाहेर आल्यानंतर मला बरं वाटलं. स्टेजवरुन उतरल्यानंतर मी अक्षरश: ओरडले.
कोण बाहेर गेल्यावर वाईट वाटलं?
आरती सोळंकी बाहेर गेल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. ती राहायला हवी होती. तिला पण या लोकांनी गेम करुन बाहेर काढलं. आता मी तिला फोन करणार आहे. आम्ही भेटू
बाहेर आल्यानंतर पहिलं काम काय केलं?
बाहेर आल्यावर भावाला फोन केला. माझ्या घराची चावी त्याच्याकडे असते. रात्री चारपर्यंत मी गप्पा मारत होते. कोण कोण काय काय बोलले हे त्याला सांगितलं.
VIDEO: