Urvashi Dholakia Exit From Nagin-6 : छोट्या पडद्यावरील सुपरहिट शो नागिन-6 (Nagin-6) मधून एका पात्राची एक्झिट झाली आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री उर्वशी ढोलकियाची या शोमधील भूमिका संपली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत उर्वशीने या संबंधित माहिती दिली आहे.   


उर्वशीने इंस्टाग्रामवर नागिन शोमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. व्हिडीओमध्ये उर्वशीने चाहत्यांना सांगितले की, ती शोमधून बाहेर पडत आहे. तिला टीव्ही किंवा इतर कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर काही चांगले प्रोजेक्ट मिळतील अशी अपेक्षा आहे. 


अचानक शो सोडल्याबद्दल खेद नाही 


उर्वशी म्हणाली, "नागिनच्या शूटिंगचा आज माझा शेवटचा दिवस होता. मी यापुढे नागिनचा भाग असणार नाही. मी या शोमधून बाहेर पडली आहे. तुम्ही माझ्यावर केलेल्या प्रेम आणि समर्थनासाठी आणि कौतुकाबद्दल तुम्हा सर्वांचे आभार." मी लवकरच टीव्ही स्क्रीनवर परत येण्याची वाट पाहत आहे. टीव्हीने मला सर्व काही दिले आहे. मी आणखी चांगले काम करण्यास उत्सुक आहे, मग ते कोणतेही प्लॅटफॉर्म असो. इतके वर्ष माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आज जी मी आहे ती तुमच्यामुळेच आहे. मी हे नेहमी म्हणते आणि नेहमी म्हणत राहीन."अशा शब्दांत उर्वशीने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 






उर्वशी ढोलकियाने एकता कपूरच्या सुपरहिट 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मधील 'कोमोलिका'ची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या व्हिडीओमध्ये उर्वशीने प्रोडक्शन हाऊस, कलाकार आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. एवढेच नाही तर उर्वशीला 'नागिन 6' ची लीड अॅक्ट्रेस तेजस्वी प्रकाशने फेअरवेल पार्टीही दिली असे उर्वशी म्हणाली. 


उर्वशीने सहकलाकारांचे आभार मानले


उर्वशीने बालाजी प्रॉडक्शन आणि सहकलाकारांचे आभार मानले आणि लिहिले, "नागिनच्या संपूर्ण टीमसोबत काम करणे खूप छान वाटले. माझ्यावर नेहमी विश्वास ठेवल्याबद्दल मी बालाजी टेलिफिल्म्सचे नक्कीच आभार मानू इच्छिते." बालाजीबरोबर खूप जुने नाते आहे. आणि ते खूप छान आहे. तेजू, महेक, सुधा जी, सिम्बा (माझा सिम्बू), प्रतीक, पुनीत चाचू जी, अभिषेक, ऋषू, बकुल... असे बरेच लोक आहेत ज्यांच्यासोबत मी खूप छान बॉन्ड होता. मी सगळ्यांना मिस करणार आहे, पण शो पाहत राहा."असे उर्वशी म्हणाली. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Rana Daggubati: 'लोक साऊथ चित्रपटांची खिल्ली उडवायचे'; राणा दग्गुबातीनं दाक्षिणात्य चित्रपटांबाबत सांगितलं