Shark Tank India Season 2: शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या कार्यक्रमाचा दुसरा सिझन आता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शार्क टँक इंडिया-2 (Shark Tank Indi-2) चा प्रोमो काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीनं सोशल मीडियावर शेअर केला. या प्रोमोमध्ये शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सिझनचे परीक्षक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) दिसले नाहीत त्यामुळे नेटकरी देखील भडकले होते. आता अश्नीर ग्रोव्हर यांनी शार्क टँक इंडियाच्या नव्या सीझनमध्ये न जाण्याचं कारण सांगितलं.
एका मुलाखतीमध्ये शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सीझनमध्ये न जाण्याबाबत अश्नीर यांना विचारण्यात आलं. यावेळी अश्नीर यांनी उत्तर दिलं की, तो शो मला अफॉर्ड करु शकत नाही. तसेच पुढे त्यांनी सांगितलं की, बऱ्याच वेळा फक्त पैशांचा नाही तर लायकीचा देखील विचार केला जातो. डिसेंबर महिन्यामध्ये अश्नीर ग्रोव्हर यांचे दोगलापन हे लाँच केले जाणार आहे. अश्नीर ग्रोव्हर हे त्यांची ऑटोबॉयोग्राफी दोगलापनला सध्या प्रमोट करत आहेत.
बिग बॉसबाबत काय म्हणाले अश्नीर ग्रोव्हर?
'मी हा कार्यक्रम बघतो. जर सलमानपेक्षा जास्त पैसे मला मिळाले तर मी या शोमध्ये जाण्याचा विचार करेल. पण मला वाटतं हा शो आता जुना झाला आहे. बिग बॉससाठी मला ऑफर देण्यात आली होती पण मी नकार दिला.' असं अश्नीर ग्रोव्हर यांनी सांगितलं.
‘शादी डॉट कॉम’ची सह-संस्थापक अनुपम मित्तल, ‘बोट’ कंपनीचे को सह-संस्थापक अमन गुप्ता, ‘लेंस्कार्ट’ कंपनीचे संस्थापक पीयुष बंसल, 'शुगर कॉस्मेटिक्स' कंपनीच्या सह-संस्थापक विनीता सिंह आणि 'एमक्योर फार्मास्युटिकल्स'च्या कार्यकारी संचालक नमिता थापरही दुसऱ्या सीझनमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडतील. कार देखो ग्रुपचे सह-संस्थापक आणि सीईओ अमित जैन यांची दुसऱ्या सीझनमध्ये एन्ट्री होणार आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि मामा अर्थच्या संस्थापक गझल अलघ हे या सिझनचे परीक्षक होणार नाहीत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: